युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

🔹युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे जाहीर निषेध

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.११सप्टेंबर):-मुंबई येथील लालबागचा राजा गणपती संबंधित वार्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार यांना ओळखपत्र आणि विशेष पास बाळगला असतानाही ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना वृत्तांकनासाठी रोखून ठेवून अरेरावी भाषेचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षकांचा युवा पत्रकार असोशियन महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे जाहीर निषेध तसेच, पत्रकारांशी उद्धटपणे वागणाऱ्या पोलीस निरीक्षक संजय निकम यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे अशी मागणीही युवा पत्रकार अशोशिएशन यांनी लेखी निवेदनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना केली आहे.

कोरोना कालावधीत जीवावर उदार होऊन वृत्तांकन करत, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा विविध बातम्यांद्वारे सार्वजनिक करून, कोरोना संबंधित उपचार यंत्रणा वेळीच सुव्यवस्थित करून घेतली. ज्यामुळे, अनेक कोरोना बाधितांचे प्राण वाचले आहेत. तर, लॉकडाऊन कालावधीत शासकीय यंत्रणेकडून सर्व सामान्य जनतेचा होणारा छळ जगासमोर आणण्यात पत्रकार आणि वृत्तसमूहांचा मोठा वाटा आहे. या पुढे अशा पद्धतीनं कोणत्याच पत्रकारांना वागणूक दिली जाणार नाही सोबत त्यांना योग्य पद्धतीने सहकार्य केले जावे याबदल त्यांना लेखी सूचना देण्यात याव्यात अशी ही मागणी करण्यात करत आहोत.

मात्र, तरी ही पोलीस विभागाकडून मिळणारी अशाप्रकारची अपमानित करणारी वागणून कुठेतरी प्रसार माध्यमांवर पोलिसी बळाचा वापर करून राज्य शासन वृत्तसमूहांना नियंत्रित करू पाहत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.यावेळी युवा पत्रकार असो.कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रियाज जैनापुरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष फिरोज खाटीक, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख योगेश कांबळे,सदस्य फरीद शेख,असलम मुजावर,आदम फकीर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED