चिमुरात आ. गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्यास शेण फासून काँग्रेसने केले दहन

32

🔸ना.वडेट्टीवार यांच्यावर लावलेले आरोप पुराव्यासह सिद्ध केल्यास आ. गोपीचंद पडळकर यांना दारू विक्रीचे दुकान भेट देणार – कांग्रेस नेते धनराज मुंगले

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11सप्टेंबर):-भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यानी महाराष्ट्रातील ओबीसी नेते, बहुजन कल्याण मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात महाज्योती संस्था व जिल्ह्यातील दारू बंदी उठविल्या संदर्भात खालच्या स्तराचे वक्तव्य करून राज्यातील जनतेसह काँग्रेस कार्यकर्त्यांचे मन दुखवीली
आहेत. या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा जिप सदस्य गजानन बुटके व चिमूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते धनराज मुंगले यांच्या नेतृत्वाखाली येथील चिमूर येथील नेहरू चौकात आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोड्या-चप्पलेचे हार घालून “गोपीचंद पडळकर, मुर्दाबाद!” अश्या घोषणा देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. शेवटी आ. गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी चिमूर शहर कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भीमराव ठावरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास डांगे, सुधीर पंदिलवार, चिमूर नप चे माजी नगरसेवक उमेश हिंगे, प्रा.राजू दांडेकर, जावाभाई, प्रमोद दांडेकर, स्वप्नील लांडगे, राकेश साठोने, सुनील कडवे,निखिल डोईजड, आबीद बेग,राजू ननावरे,प्रमोद बोरकुटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आ. गोपीचंद पडळकर यांनी ना.विजय वडेट्टीवार यांचेवर बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, गणमान्य व्यक्तीवर आरोप करून प्रसार माध्यमात चर्चेत राहण्याचा त्यांना जुना व जटील आजार आहे, त्यांचा आजार आता कांग्रेसच बरा करेल असे मत जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन बुटके यांनी निषेध आंदोलना नंतर प्रसार माध्यमापुढे व्यक्त केले.आ. गोपीचंद पडळकर यांना ना.विजय वडेट्टीवार यांचेवर बिनबुडाचे आरोप करणे सुरुवातीला सोपे वाटले मात्र आता त्यांना महाराष्ट्रात फिरणे कठीण झाले आहे, सर्वत्र त्यांचे विरोधात आंदोलन सुरू केले आहे, यापुढे असे आरोप केल्यास बरेच महागात पडेल, असेही बुटके म्हणाले.
—————-

▪️आ. गोपीचंद पडळकर यांना दारू विक्रीचे दुकान भेट देणार – कांग्रेस नेते धनराज मुंगले

 

ना.वडेट्टीवार यांच्यावर लावलेले आरोप पुराव्यासह सिद्धकेल्यास आ. गोपीचंद पडळकर यांना स्वतःच्या मालकी चे दोन दारू विक्रीचे दुकानापैकी एक दुकान भेट देणार असल्याची घोषणा कांग्रेस नेते धनराज मुंगले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.आ. गोपीचंद पडळकर हे कोणत्या नशेत राहून मोठ्या व्यक्तीवर आरोप करतात हा संशोधनाचा विषय आहे. पुरावे नसताना आरोप करणे त्यांना महागात पडेल असे मत पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.