मुळावा, सुकळी, भांबरखेडा, येथे वंचित बहुजन आघाडी च्या ग्राम शाखेच्या फलकाचे अनावरण

✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.11सप्टेंबर):-येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता ,या अभियानांतर्गत, वंचित बहुजन आघाडी च्या ग्राम शाखा फलक अनावरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

गेली अनेक दशके प्रस्थापितांचा व काँग्रेस पक्षाचा दबदबा असलेल्या मुळावा जिल्हा परिषद सर्कल मध्ये वंचित बहुजन आघाडी उमरखेड तालुक्याच्या वतीने आज दिनांक 09 अगस्ट 2021 रोजी मोठ्या धडाक्यात ग्रामशाखांचे अनावरण करण्यात आले त्यामध्ये शाखा भांबरखेडा, सुकळी नवीन, व मुळावा शांतीनगर येथील शाखांचे अनावरण मोठ्या थाटात संपन्न झाले ,सदरील शाखा अनावरण प्रसंगी जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड ,जिल्हा महासचिव डी के दामोदर, जिल्हा महासचिव जॉन्टी उर्फ प्रशांत विणकरे, जिल्हा संघटक राजकुमार टाळीकुटे, प्रसिद्धीप्रमुख विजय लहाने, पुसदतालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, उमरखेड तालुका अध्यक्ष संतोष जोगदंडे, महागाव शहर प्रमुख पप्पू कावळे, महासचिव मौलाना शेख मदार, उपाध्यक्ष मौलाना सय्यद हुसेन, दत्तात्रेय पाईकराव (माजी पोलीस पाटील मुळावा), राजाभाऊ दाभाडे, मार्शल विनोद बर्डे, पंजाबराव शिंदे, पत्रकार प्रदीप बाराटे , पत्रकार धम्मदीप कांबळे, बाबुराव नवसागरे, दीपक पद्मे, प्रकाश खिल्लारे, धम्मदीप काळबांडे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, राजेभाऊ पंडित, बौद्धाचार्य धम्मदीप पाईकराव, गझलकार शेख गणी, राठोड, सुधाकर लोखंडे,मिलिंद पाईकराव, अनिल जोगदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडले.

या वेळी मुळावा जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावातील शेकडो महिला, पुरुष, व युवकांची उपस्थिती होती.लवकरच येत्या काहिदिवसात तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद सर्कल मध्ये, पंचायत समिती गणात आहेत, गाव तिथे शाखा येणार आहे.

अभियान राबवण्यात येणार असल्याचा संकल्प वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आला.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED