चांदू आंबटवाड यांची सकल मल्हार धनगर सेनेच्या नायगाव तालुकाध्यक्षपदी निवड

✒️नायगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नायगाव(दि.11सप्टेंबर):-तालुक्यातील कुंटूर येथील रहिवाशी असलेले व धनगर समाजातील आपली योग्यता ,प्रतिष्ठा व समाजाप्रति असलेली तळमळ व सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष प्रल्हादभाऊ सोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत चांदू कोंडीबा आंबटवाड यांची नायगाव तालुका अध्यक्ष  या पदावर नियुक्ती करण्यात आली.      

     सदरच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष प्रल्हादभाऊ सोरमारे असे म्हणाले कि,चांदू आंबटवाड यांना देण्यात आलेल्या पदाचा उपयोग आपण आपल्या परिसरात सकल मल्हार धनगर सेनेचे कार्य आपल्या कार्यक्षत्रात व्यवस्थित उभे कराल असा आत्मविश्वास असल्याचे यावेळी बोलून दाखविले आहे. चांदू आंबटवाड यांना नायगाव तालुका अध्यक्षपदी निवड करून नियुक्ती पत्र देऊन नवीन जबाबदारीस व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या देण्यात आल्या यानिवडीबद्दल परिसरातील सर्वस्थरातून अभिनंदनाच वर्षाव होत आहे.  यानिवडी बद्दल आंबटवाड यांचा पत्रकार माधव धडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED