शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी

🔸हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी

🔹राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन..

✒️अशोक हाके(बिलोली(ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.11सप्टेंबर):;तालुक्यात दिनांक सात रोजी झालेल्या ढगफुटी प्रजन्यवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन सर्वच शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले तर काही गावात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर काही शेतकऱ्यांचे जनावरेही दगावली अशा सर्वांना नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार बिलोली यांना निवेदन देण्यात आले आहे…

बिलोली तालुक्यात मागील दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस येऊन तालुक्यातील सर्वच तलाव,नदी नाल्यांना पूर येऊन तालुक्यातील हजारो हेक्‍टर शेती पाण्याखाली गेली,त्यात हातातोंडाशी आलेले उडीद,मूग, सोयाबीन,कापूस,अशा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांच्या घरांची पडझड होऊन त्यांचे संसार उघड्यावर पडले असून त्यात अनेक शेतकऱ्यांचे जनावरेही दगावले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिलोलीच्या वतीने तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांना देण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, जिल्हा सरचिटणीस गोसोद्दीन खुरेशी,माजी सभापती व्यंकटराव पांडवे,युवक तालुकाध्यक्ष रणजीत पाटील हिवराळे, लक्ष्मणराव देगलूरे,विद्यार्थी तालुका अध्यक्ष विकास पाटील दगडापुरकर,तालुका उपाध्यक्ष दत्तगिरी नारायणगिरी,युवक सरचिटणीस निळकंठ पाटील दुडले, कुंडलवाडी शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार,युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, उपाध्यक्ष गंगाधर मरकंटे, अल्पसंख्याक शहरध्यक्ष महंमद मुनीर, पिराजी पाटील पांडागळे,आनंद गुडमुलवार,नागनाथ पाटील शेटकर,आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते……

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED