महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक मा.संजयजी पांडे साहेब यांना कायम DGP पदावर ठेवावे – शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची पंतप्रधानांकडे मागणी

✒️नायगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नायगाव(दि.11सप्टेंबर):- महाराष्ट्र राज्या करिता566र पोलीस महासंचालक म्हणून त्यांच्या सेवानिवृत्ती पर्यंत DGP पदावर कायम ठेवावे, साहेबांनी पदभार स्वीकारल्यापासून अतिशय क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र पोलीस खात्यासाठी घेतले आहेत, तसेच सर्व महाराष्ट्र पोलीस बांधवांचं ही असे मत आहे, त्यांचं कार्य खूप कौतुकास्पद, वाखन्याजोगं आहे, मा.श्री.संजयजी पांडे साहेबांना पोलीस महासंचालक पदावर कायम ठेवावे अशी मागणी नायगांव बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांनी ई पत्राद्वारे देशाच्या पंतप्रधानांसह राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

पोलीस महासंचालक मा.पांडे साहेब यांनी जेव्हा पासून पद भार घेतले तेव्हा पासून तर त्यांनी पूर्ण पोलीस खात्या मध्ये अमूलाग्र बदल केले आहेत .हा त्यांचा आताच च कामाचा पुरावा नसून ते कोणत्याही ठिकाणी असले तरी हिच पद्धत त्यांची आहे. आणि कोणत्याही प्रकारचा त्यांच्या वर डाग लागलेला नाही त्यांची कायम ओळख ही इमानदार अधिकारी म्हणून राहली आहे. पोलीस खात्यात इमानदार आहेत हे देशासह जगाला त्यांनी त्यांच्या कामातून दाखवले. महाराष्ट्र राज्याचे पोलीस संचालक पदावर मा.पांडे साहेब कायम राहावे पूर्ण महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र राज्यातील जनता उघड मनाने बोलत आहे, देवमाणूस मा.पांडे साहेब राज्याचे महासंचालक म्हणून त्यांच्या सेवानिवृत्ती पर्यंत कायम नाही राहावे, असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी व्यक्त केले आहेत, यासह केंद्र सरकार व राज्य सरकारने या मागण्यांचा सकारात्मक विचार करील अशी अपेक्षाही शिवानंद पांचाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहेत,

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED