पुसद तालुक्यातील ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दर्जेदार सेवा* *पुरविण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना पत्र

30

🔸तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांचेकडून पत्र

✒️बाळासाहेब ढोले(प्रतिनिधी पुसद)

पुसद(दि.11सप्टेंबर):-तालुक्यातील ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य विषयी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देण्यात आले आहे.ग्रामीण भागातील आरोग्य आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या शासन नियमानुसार रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे.सोबतच तालुक्यातील आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे आदेश तात्काळ देण्याची मागणी देखील निवेदनातून केली आहे.येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.

येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मार्फत दिलेल्या निवेदनामध्ये मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुसद तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याच्या दृष्टीने रुग्णावर कुठल्याही प्रकारच्या आरोग्यविषयक सुविधा वेळेवर मिळत नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुविधा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. परिणामी रुग्णांच्या जीवितास धोका होण्याची संभाव्यता नाकारता येत नाही तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर व त्यांच्या उपकेंद्रावर औषधांचा तुटवडा होता असल्यामुळे रुग्णांना खाजगी मेडिकल मधून औषधी खरेदी करण्याची वेळ आली आहे. यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याची माहिती मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र वर औषधी वाटप करण्यासाठी संयोजक नसल्यामुळे आरोग्य सहाय्यकांना औषधी वाटप करण्याची वेळ आली आहे. त्याच प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या उपकेंद्रातील रुग्णांसाठी अनेक वर्षापासून रुग्णवाहिका नाही त्यामुळे अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना निवड करण्यासाठी खाजगी वाहनांचा किंवा रुग्णवाहिकेचा आधार घेण्याची वेळ आली आहे. अत्यंत बिकट परिस्थिती ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मध्ये उपचारासाठी रुग्णांना दाखल केल्यास त्यावेळेस डॉक्टर आरोग्य सहाय्यक नर्सेस अधिष्ठान वेळेवर उपस्थित राहत नाही. यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तालुक्यातील बरस प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांमध्ये अपुऱ्या स्टाफ मुळे रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे. सध्या तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये सर्दी, खोकला,ताप व डेंगूचे रुग्णाच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढत असून यामुळे लहानपणापासून पासून ते प्रोढां पर्यंतचे रुग्ण आजाराने ग्रस्त होत आहे. त्यात कोरोना व त्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे नियमावलीचे ग्रामीण भागामध्ये काटेकोरपणे पालन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांकडून याच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी याची व्यापकता लक्षात घेऊन तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टाळण्याची मागणी केली आहे. यात विशेष करून तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मध्ये कार्यरत असलेल्या स्टाफना मुख्यालयी राहण्याचे आदेश तात्काळ देण्याची मागणी मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेखसह पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदनावर सह्या करून केली आहे.

चौकट
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये स्टाफची रिक्त पदे तालुक्यातील आरोग्य केंद्र उपकेंद्रांमध्ये बऱ्याच प्रमाणात स्टाफची रिक्त पदे आहेत. ग्रामीण भागातील केंद्रामध्ये आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, नेत्रतज्ञ, वाहन चालक परिचर, शिपाई, कंपाउंडर लॅब टेक्निशियन, फार्मसिस्ट इत्यादी पदे रिक्त असल्यामुळे शासनाने ती रिक्त पदे भरल्यास तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मधील रुग्णांना योग्य व 24तास सुविधा मिळू शकते. रिक्त पदे भरण्यास रुग्णांची हेळसांड होणार नाही असा दावा देखील मानव विकास परिषदेकडून केला आहे.