मुरूम उत्खनन प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पर्यावरण प्रेमी चे आंदोलन

30

🔹खडसंगी बफर झोन मुरूम उत्खनन प्रकरण

🔸वन्यजिव व वनसंपदेला नुकसान

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.12सप्टेंबर):-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत खडसंगी बफर झोन मध्ये मे महिण्यात मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन होत असल्ययाची धक्कादायक बाब मे महिन्यात समोर आली.

पण तिन महिण्याचा कालावधी होऊन सुद्धा कोणावरही कारवाई करण्यात आली नाही . त्यामुळे वनविभागावर शंका निर्माण झाली आहे. कक्ष क्रमांक ५२,५३,५४,५५ यामध्ये मुरूमाचे उत्खनन करण्यात आले.या मूरुमाचा उपयोग जंगलातील रस्ते तयार करण्यासाठी व रपटे करण्यासाठी होत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडुन बोलले जात आहे. पण रस्ते तयार करण्यासाठी मुरूम बाहेरून आणावा लागतो की बफर झोनमधून काढावा लागतो या बाबत शंका निर्माण झाली आहे . या बफर झोनमध्ये असे अनेक प्रकारचे मोठे मोठे खड्डे असु शकतात असा संशय आहे.

या परिसरात वन्य प्राण्यांच्या वावर आहे.मूरुमाच्या उत्खननामुळे वन्यजिवाना धोका निर्मान झाला आहे.वाघ,हरिण,चितळ,अस्वल आदी वन्य जिवांचा जिव खड्यात पडून जाऊ शकतो.वनसंपदेला मोठ्या प्रमाणात नुकसाण पोहचले आहे. या मुरुमाच्या उत्खननासाठी वरिष्ट अधिका-यांची परवानगी होती का ?मूरुम उत्खननासाठी निविदा काढण्यात आली का? अशा अनेक शंका तयार होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करण्यात आले यावेळी पर्यावरन संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे, सुशांत इंदोरकर ,राज बुच्चे,पिपलायण आष्टणकर, मंगेश शेंडे, राहुल गहुकर, मोहण सातपैसे, आदी पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.