नासिक जुना आडगाव परिसरात हत्येचा उलगडा : दारू पिण्यासाठी वीस(20) रुपये दिले नाही म्हणून कटरने वार

32

✒️विजय केदारे(नासिक,विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.12सप्टेंबर):- जुना आडगाव नाका परिसरात एक अनोखी इसमाची शुक्रवारी रात्री हत्या झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपीला तपोवन परिसरात तील गार्डन मधून शोधून काढले या घटने दारू पिण्यासाठी वीस रुपये दिले नाही म्हणून कटरने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे हत्या करणारा आरोपी पंडित रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्या (32) असून तो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद तालुका त्र्यंबकेश्वर येथील आहे.

दरम्यान या घटनेत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव सुनील असून तो गंगा घाटावरच राहून बिगारी चे काम करत होता या दोघांची पूर्वी कोणतीही ओळख नसल्याचे समोर आले आहे शुक्रवारी रात्री ही हत्या झाल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली होती.

जवळपास एक किलोमीटर अंतर त्याचा पाठलाग करून धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केल्याचे बोलले जात होते राम रतन लॉज येथील बंद गाळ्या समोर हा अनोळखी इसम जखमी अवस्थेत होता ही घटना समजतात पोलीस घटनास्थळी गेले त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण तेथे त्याचा मृत्यू झाला या युवकाच्या तिचे कारण सकाळी समजू शकले नाही पंचवटी पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपीला गजाआड केल्याने त्याने खुनाची कबुली दिली आहे