बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने आबासाहेब राजेंद्र वाघ व बाळासाहेब जाधव यांचा अनमोल ग्रंथ देऊन सन्मान !

26

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.12सप्टेंबर):– बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने भारत मुक्ती मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष – आबासाहेब राजेंद्र वाघ व दैनिक सामना चे निर्भीड पत्रकार बाळासाहेब जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की प्रथम सत्कारमुर्ती तथागत गौतम बुद्ध – संत कबीर – संत रविदास – राष्ट्रसंत तुकाराम महाराज – छत्रपती शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचे सच्चे वारसदार , धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य , अभ्यासू व्यक्तिमत्व – पुस्तक मित्र – वृक्ष मित्र – सर्प मित्र – बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक – सत्यशोधक – मा.आबासाहेब राजेंद्र वाघ यांची बामसेफच्या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा महाराष्ट्र राज्य [ OBC मोर्चा ] कार्यकारी सदस्य पदी निवड करण्यात आली. म्हणुन छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा सल्लागार कैलास पवार, प्रोटान चे सुनील देशमुख यांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पुष्पगुच्छ – अनमोल ग्रंथ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

यानंतर दुसरे सत्कारमूर्ती
शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचे सच्चे वारसदार , धरणगांव अधिकृत पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक , दैनिक सामना चे पत्रकार – मा.बाळासाहेब जाधव यांची कैकाडी समाज आघाडी महाराष्ट्र राज्य ” जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी ” निवड झाली म्हणुन धरणगाव माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी, बामसेफचे जिल्हा महासचिव हेमंत माळी, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे प्रोटान शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, राष्ट्रीय किसान मोर्चा चे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ – अनमोल ग्रंथ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

या सत्कारमुर्तींचा धरणगाव बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने अनमोल ग्रंथ सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बामसेफचे जिल्हा महासचिव हेमंत माळी , कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा सल्लागार कैलास पवार, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष – गौतम गजरे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष – गोरख देशमुख, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे शहराध्यक्ष – लोकमत चे लक्ष्‍मण माळी, दै. सामना चे बाळासाहेब जाधव, दै. साईमतचे कमलाकर पाटील, धरणगाव बामसेफचे तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील व मोठ्या संख्येने बहुजन बांधव उपस्थित होते.