संगणकीय युगातही चित्रकलेची श्रेष्ठत्व कायम !

31

✒️भावनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भावनगर(दि.12सप्टेंबर):-संगणकीय युगात विद्यार्थ्यांमध्ये लिहीण्याची सवय जवळपास मोडली असून चित्रकला लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना ही कला जिवंत ठेवण्यासाठी समाजातील महिला वर्ग पुढे आला आहे ही समाधानाची नव्हे तर आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक जतीन शहा यांनी केले आहे.इंडियन आर्टिस्ट असोसिएशन गुजरातच्या “अनोखी द आर्टसी क्लब”च्या वतीने भावनगर येथील श्री खोदीदास परमार आर्ट गॅलरी येथे दि.११,१२ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय स्तरावरील सुंदर चित्र, फोटोग्राफी, मिक्स्ड मीडिया मिनी आर्ट वर्कचे एक अनोखे कलात्मक प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.त्या प्रदर्शनाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

संगणकीय युगात चित्रकला जगलीच पाहिजे असे उषा पाठक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.इंडियन आर्टिस्ट असोसिएशन गुजरातच्या “अनोखी द आर्टसी क्लब”च्या वतीने भावनगर येथील श्री खोदीदास परमार आर्ट गॅलरी येथे दि.११,१२ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय स्तरावरील सुंदर चित्र, फोटोग्राफी, मिक्स्ड मीडिया मिनी आर्ट वर्कचे एक अनोखे कलात्मक प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.त्या प्रदर्शनाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.देशभरातील विविध राज्यांतील निवडक नामांकित 50 कलाकारांच्या सुमारे 200 कलाकृतींचे यात समावेश करण्यात आलेले आहे.

या अनोख्या कला प्रदर्शनात महाराष्ट्रातील एकमेव प्रवेशिकेची निवड करण्यात आली असून यात सोलापूरच्या कलाकार विद्यार्थी वठारे यांच्या विविध कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.अनोखी द आर्टसी क्लब ही बिगर व्यावसायिक हेतूने तंत्रज्ञानाच्या या युगातही चित्रकलेचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी देशभरातील कलाकारांना त्यांची कला आणि नावीन्य दाखवण्याची संधी मिळावी,कला आणि कलाकारांसाठी काहीतरी नवीन करण्यासाठी कार्यरत संस्था आहे.यासाठी प्रदेशाध्यक्ष पूर्वी सोलंकी,या सतत कार्यरत असतात.दोन दिवसाचे हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी त्यांना मुख्य सचिव जानखाना राठोड, भावनगर जिल्हाध्यक्षा नयना पटेल, उपाध्यक्ष शीतल सवानी, सचिव बीना गोगदानी प्रयत्न करत आहेत.