महाराष्ट्रातील १३ मुष्टीयोध्दे राष्ट्रीय स्‍पर्धेसाठी पात्र

28

🔸राज्‍यस्‍तरीय पुरुष मुष्टियुध्द अजिंक्‍यपद स्‍पर्धेचा समारोप

🔹क्रीडा प्रबोधनी अकोला, प्रथम, मुंबईला द्वितीय तर पुण्याला तृतीय स्‍थान

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.12सप्टेंबर):-येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेला 90 व्या राज्यस्तरीय पुरुष मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीच्या विविध वजन गटातील महाराष्ट्रातील 13 मुष्टियोद्धे बेल्लारी (कर्नाटक) येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये मुंबई विभागाचे 5, पुणे जिल्ह्याचे 4, कोल्हापूर 3, जालना 1 या मुष्टियोद्ध्यांचा समावेश आहे. या सर्व विजयी खेळांडूंना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन गौरव करण्यात आला व स्पर्धेचा समारोप करण्यात आला. सात सप्टेंबर रोजी झालेल्या मुष्टियुद्धाच्या अंतिम लढतीत किमान (46 ते 48 किलो) वजन गटात मुंबईच्या शिवम विश्वकर्माने नागपूरच्या लुेन शाहूला 5-0ने धुळ चारली. फ्लायवेट (48 ते 51 किलो) वजन गटात कोल्हापूरच्या अजय पेंदोरने नागपूरच्या नितेश पटलेचा पराभव केला.

बॉटमवेट (51 ते 54 किलो) वजनगटात पुण्याच्या संकेत गौड याने क्रीडा प्रबोधिनीच्यासुबोध कांबळेचा पराभव केला. फिदरवेट (54 ते 57 किलो) वजनगटात पुण्याच्या हृषीकेश गौड याने क्रीडा प्रबोधिनीच्या दर्शन डफचा 5-0 ने पराभव केला. लाईट वेट(57 ते 60 किलो वजन गटात) कोल्हापूरच्या हरिवंश तिवारीने नगरच्या नितीन चौधरीचा पराभव केला. लाईटविदर वेट (60 ते 63.5 किलो) वजन गटात पुण्याच्या यश गौडने कोल्हापूरच्या सचिन चव्हाणला धूळ चारली. विदरवेट (63.5 ते 67) किलो वजन गटात कोल्हापूरच्या मो. राहुल सिद्धीकी याने
नागपूरच्या रितिक मेश्रामचा पराभव केला. लाईट मेडलवेट (67 ते 71 किलो) वजन गटात जालन्याच्या नागेश खरारेने वर्धाच्या ऋतिक तिवारीचा पराभव केला.

मिडलवेट (71 ते 75 किलो) वजनगटात मुंबईच्या निखिल दुबेने मुंबई उपनगरच्या युगाधर तांबटचा पराभव केला. लाईट हेवीवेट (75 ते 80 किलो) वजन गटात मुंबईच्या विघ्नेश खोपडेने पुण्याच्या मुणाल भोसलेचा पराभव केला. क्रुझरवेट (80 ते 86 किलो) वजन गटात मुंबई उपनगराच्या मृणाल झरेकरने पुण्याच्या आकाश मोरेचा 5-0 गुणांनी पराभव केला. हेवी वेट (86 ते 92 किलो) वजन गटात मुंबईच्या अनुज कुक्रेती याने मुंबईच्या सौरभ लेणकरचा 4-1 गुणांनी पराभव केला. सुपरहेवीवेट (92 किलो) वजन गटात पुण्याच्या रेनॉल्ड जोसेफने मुंबईच्या अनिलसिंगचा
पराभव केला. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता मुष्टियुद्ध संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, उपाध्यक्ष नीलेश देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. संतोष आंबेकर, राज सोळंकी यांनी सहकार्य केले.

चौकट – सहकार्याुळे स्पर्धा यशस्वी ः विठ्ठल लोखंडकार
बुलडाणा या छोट्याशा शहरत राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धा कोरोनाचे निर्बंध असताना यशस्वीपणे पार पडल्या. यासाठी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजयगायकवाड, आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार राजेश एकडे, आमदार श्वेता महाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार गोपीकिशनजी बाजोरिया, माजी आमदार राहुल बोंद्रे, बुलडाणा अर्बनचे व्‍यवस्‍थापीक संचालक सुकेशजी झंवर हे होते. तसेच प्रमुख उपस्‍थितीत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार राहुलजी बोंद्रे, जि.प.सदस्‍या सौ.जयश्री शेळके, भाजपाचे देवेंद्र खोत, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा क्रीडाधिकारी गणेश जाधव यांचे सहकार्य लाभले. भविष्यात राज्यस्तरावर महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धा जिजाऊ कपाच्या नावाने आयोजित करण्यात येण्याचा मानस जिल्हाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांनी व्यक्त केला.