आष्टीत होणा-या रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा

24

🔸यावर्षी आष्टीकर रक्तदानाने साजरा करणार गणेशोत्सव

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.12सप्टेंबर):-कोरोनाच्या काळात रक्त टंचाई जास्त भासत आहे.परंतु अशा संकटावेळेस आपणही समाजाचे देणे लागत असल्याने भारतीय जैन संघटना आष्टी व आष्टी शहरातील सर्व गणेश मंडळांच्या वतीने आष्टीत बुधवारी होणा-या रक्तदानास मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन आष्टी शहरातील सर्व गणेश मंडळाच्या वतीने व भारतीय जैन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.यंदाचा गणेशउत्सोवात भारतीय जैन संघटना व शहरातील सर्व गणेश मंडळाच्यावतीने बुधवार दि.१५ रोजी सकाळी दहा ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या देशावर कोरोनाचे संकट असून,आरोग्य विभागाने तिस-या लाटेचेही संकेत दिले आहेत.त्यामुळे गेल्या वर्षापासून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले नाहीत.परिणामी रक्तपेढीत रक्तसाठाच शिल्लक नाही.त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव हा आष्टीकरांनी रक्तदान करून साजरा करण्याचे ठरविले आहे.येणा-या बुधवारी शहरातील सर्व गणेश मंडळाच्या सदस्यांनी व आष्टी शहरातील नागरिकांनी होणा-या रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.रक्तदान शिबीरासाठी दोन केंद्र केलेले असून पहिले केंद्र शनि मंदीर आष्टी व दुसरे केंद्र जि.प.मुलांची शाळा,किनारा चौक आष्टी येथे नियोजन केलेले आहे.