गजानन खंडागळे ला उपसरपंच आक्रम सौदागर यांच्या कडून 21 हजाराची मदत

✒️तलवादा प्रतिनिधी(शेख आतिख )

तलवाडा(दि.12सप्टेंबर):-प्रि नॅशनल पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेला सुवर्ण पदक विजेता तलवादा येथील युवक गजानन खंडागळे यांचा तलवाडा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याची जाणीव असून त्याने मदतीसाठी आवाहन केले होते.

तसेच संत रविदास प्रतिष्ठान चे तुळशीराम वाघमारे व त्वरिता अर्बन बँकेचे चेअरमन विजय डोंगरे सर यांनी ही मदतीचे आवाहन केले होते याची दखल घेत तलवाडा ग्रामपंचायत चे उपसरपंच आक्रम सौदागर यांनी गजानन ला 21 हजाराची रोख मदत दिली,सत्कार प्रसंगी विष्णू तात्या हात्ते,आक्रम सौदागर,दत्ता हात्ते,दादाराव रोकडे,नजिर कुरेशी,हभप गणेश कचरे,तुळशीराम वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी बाबासाहेब आठवले,रवींद्र गांधले,किशोर हात्ते,विजय डोंगरे सर,मोहन डोंगरे ,साहेबराव कुर्हाडे,पत्रकार अल्ताफ कुरेशी,बापू गाडेकर,सचिन नारकर,एकनाथ नारकर,प्रल्हाद मरकड,शरद खुरुद यांच्या सह नागरिक उपस्थित होते शेवटी गजानन खंडागळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याला या क्षेत्रात त्याचे प्रशिक्षक सौरभ सलावणे व सुरेंद्र कांबळे यांनी खूप परिश्रम घेऊन शिकवले असल्याचे गजानन खंडागळे यांनी सांगितले व सर्वांचे आभार मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED