जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

37

🔸जिल्हाधिकारी यांचा आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पडत्या पावसात दुचाकीवरून प्रवास

🔹आमला ते धानोरा पाझर तलाव फुटून झालेल्या नुकसानीबाबत पाहणी

✒️तलवादा प्रतिनिधी(शेख आतिख )

बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी 11 सप्टेंबर रोजी दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत गेवराई तालुक्यात अतिवृष्टी व पाझर तलाव फुटून झालेल्या नुकसानीबाबत पाहणी करण्यासाठी ग्राउंड लेवल ला हजर होते त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली वर शेतकऱ्यांना धीर देत सर्वोतोपरी सरसकट मदत मिळवून दिली जाईल असे सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी बीड तालुका कृषी अधिकारी गेवराई व कर्मचारी हजर होते, पडत्या पावसात चिखल तुडवत जिल्हाधिकारी व संपूर्ण टीम आपदग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी तसेच शासन निकषानुसार तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले. प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर तलाठी व इतर कर्मचारी यांचे मार्फत चालू असलेल्या प्रत्यक्ष पंचनामा व पाहणी चा आढावा घेण्यात आला तसेच पंचनामे तात्काळ संपवा अशा सूचना देण्यात आल्या .यावेळी शेतकरी यांनी आपल्या समस्यां सांगून असे जिल्हाधिकारी होणे नाही अशा भावना व्यक्त केल्या .यावेळी आम्ला व धानोरा गावचे सरपंच ,उपसरपंच ,चेअरमन ,व शेतकरी उपस्थित होते