बिबट्याच्या हल्यात मूलगा गंभीर जखमी

🔸चपराळा वन्यजीव अभयारण्यतील कर्मचाऱ्यांचे बिबट्याच्या नियंत्रणावर दुर्लक्ष

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.12सप्टेंबर):- तालुक्यातील आष्टी पेपर मिल कॉलनी मध्ये चपराळा अभयारण्य आतील बिबट्याने मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केले जखमी मुलाचे नाव अंश मनोज मोरे वय 8 हे गणेश आरती करिता परवेश सिंग सेकुरीटि गार्ड सोबत येत असताना अचानक बिबत्याने मुलावर हल्ला केला.

तेव्हा सोबत असलेल्या व्यक्तिने काटिने मारून बिबट्या ला हाकलुन लावला असून यात मुलाला हाताला गम्भीर दुखापत झाली असून मुलाला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या चपराळा अभयारण्य लागून असलेल्या गावात मानवी वस्ती घुसून मानवी हल्ले झाले आहेत परंतु चपराळा वन्यजीव अभयारण्य येथील कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे आष्टी परिसरात वन्य प्राण्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे

Breaking News, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED