ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या पलूस तालुका आढावा बैठक सम्पन्न

✒️विशेष प्रतिनिधी(अंबादास पवार)मो:-9561905573

सांगली(दि.12सप्टेंबर):- ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ची पलूस तालुका आढावा बैठक पलूस येथील शासकीय विश्रामगृहात संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता संतोष कदम यांच्या अध्यक्षतेखाली व सांगली जिल्हा अध्यक्ष दीपक भोसले, पलूस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,कार्याध्यक्ष संजय आमणे,महिला अध्यक्षा लता माने यांच्या प्रमुख उपस्तिथीत सम्पन्न झाली.यावेळी पलूस नगरपरिषदेचे नगराध्यक्ष परशुराम शिंदे यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला ,पलूस शहर व तालुक्यातील विविध विषयावर चर्चा झाली.

शहरात होत असलेल्या अवैद्य बांधकामाविषयी संघटनेने लक्ष घालावे अशी सूचना सभासदांनी मांडली, तसेच बांधकाम मजुरावरती होत असलेले अन्याय याचे निवारण व्हावे ,संघटना वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी सूचना कार्याध्यक्ष आमणे सर यांनी केली अश्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली ,संघटनेचे राष्ट्रीय कायदे सल्लागार अनिल जाधव यांना पितृशोक झालेने श्रद्धांजली वाहण्यात आली, संघटनेत तालुका कार्यकारिणीत नूतन निवडी करण्यात आली तालुका सचिव म्हणून सुरेश कारखांडे व महिला उपाध्यक्षा शितापे मॅडम यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता संतोष कदम यांनी मार्गदर्शन करताना संघटनेविषयी राष्ट्रीय , राज्य कार्यकारणी विषयी माहिती दिली व संघटनेत काम करताना भारतीय संविधनाचा आदर केला पाहिजे,तसेच जिल्हा अध्यक्ष दीपक भोसले यांनी संघटनेचे ह्यूमन राईट्स एक्सप्रेस you tube न्यूज चॅनेल ची माहिती दिली.

यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता संतोष कदम, जिल्हा अध्यक्ष दीपक भोसले, पलूस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील, कार्याध्यक्ष संजय आमणे सर, कायदे सल्लागार ऍड विकास जाधव, उपाध्यक्ष प्रशांत जाधव, जनसम्पर्क अधिकारी प्रकाश कचरे, सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव, महिला अध्यक्षा लता माने , कार्याध्यक्ष शुभांगी काशीद, सचिव मंजूषा जाधव, अक्षयराजे भोसले ,पत्रकार मोहसीन वांकर,साठे मामा,व सभासद उपस्तिथ होते, स्वागत अध्यक्ष धनाजी पाटील यांनी केले ,आभार प्रकाश कचरे यांनी मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED