विद्यार्थीना एस.टी पास त्वरित द्या- जितेंद्र पावरा

29

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

विद्यार्थ्यांना एस.टी पास त्वरित देण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री, परीवहन मंत्री यांना जितेंद्र पावरा धुळे युवा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स धुळे यांनी निवदना तर्फे मागणी केली आहे….निवेदनात म्हटले आहे की,शासनाने दि.५ जुलै २०२१ चा परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील ८ ते १२ पर्यत वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याचे निर्देश दिले.सध्या,राज्यात अनेक शाळा,महाविद्यालये सुरू आहेत.

मात्र,ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही एस.टी पास दिला जात नाही.कोविड-१९ आणि महापूरामुळे पालक आर्थिक संकटात आहे.या दोन वर्षात विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे.एस.टी पाससाठी संबंधित डेपोत चौकशी केली असता आम्हाला शासनाचा आदेश नाही.आदेश आल्यानंतरच एस. टी पास देण्यात येतील असे सांगण्यात येते.तरी,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्वरित पास देण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे…..