शेतकरी बांधवाच्या व्यथा पासुन मन सुन्न झाले –प्रा शिवराज बांगर

27

✒️बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बीड(दि.१२सप्टेबंर):-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने, वंचित प्रणित उसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा.शिवराज बांगर हे आज अतिवृष्टी होऊन तलाव फुटुन नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भेंड बुद्रुक, भेंड टाकळी, लोनवळा तांडा, टाकळी तांडा खेर्डा बुद्रुक,शिरसदेवी यथील शेतकर्यांच्या नुकासानीची पाहाणी करण्या साठी आले होते, थेट पाॅट वर चिखलात जाऊन पाहाणी केली, भेंड टाकळी यथील तलाव फुटुन कितेक शेतकर्यांचे पिके पाण्यात वाऊन गेले परंतु शेतातील माती देखील वाऊन गेली आहे.

परत जर शेती मध्ये काही पिकवायचे अशेल तर शेतात नव्याने सुपीक माती टाकावे लागेल पण ही माती टाकण्या साठी नवीन जमीन खरेदी करता एईल एवढा खर्च करावा लागेल अशे पञकारांशी बोलतांनी प्रा शिवराज बांगर पाटील यांनी सांगितले, त्यामुळे पंचनामा करतांनी फक्त पिकांचा नव्हे तर जमीनीचा देखील पंचनामा झाला पाहिजे, या मध्ये कितेक शेतकर्यांचे जनावरे, वैरन, थिबक, मोटार हे देखील वाहुन गेले आहे, कितेक शेतकर्यांचे बोअर, विहीर या देखील शेतात शोधने मुस्किल झाले आहे, काही शेतकर्यांचे बोअर हे सातबार्यांन वर ऑनलाईन नाहीत परंतु शेतात होते अशा बोअर विहीरीचा देखील पंचनामा झाला पाहिजे व प्रती एकर नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्यांना 5 लाखांची मदत जाहीर करावी अशे प्रा शिवराज बांगर यांनी मागणी केली आहे ते भेंड टाकळी यथे नुकसान झालेल्या पिकांची पाहाणी करता वेळेस पञकारांशी बोलत होते, प्रति एकर 5 लाखांची मदत जाहीर करा अशी मागणी प्रा बांगर यांनी केली आहे, कितेक शेतकर्यांचे 30-35 लाख रुपयांचे नुकासान या अतिवृष्टी मुळे झाले आहे, पिके तर गेलेच पण जमीन देखील कुछकामी झाली आहे.

त्यामुळे शासनाने जमीनीचे देखील पंचनामे करून नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्यांना एकरी 5 लाखांची मदत जाहीर करावी या मागणी साठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जातेगाव फाटा यथे 16 सप्टेंबर गुरूवारी सकाळी 11 वाजता हजारो शेतकर्यांना सोबत घेऊन रस्ता रोको करणार आहे अशी माहिती प्रा शिवराज बांगर यांनी दिली आहे, यावेळी उपस्थित गेवराई वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष सयद सुभानभाई अनंत वाव्हळे महेश कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.