महाकॉट अभियाना अंतर्गत रोटवद गावात निविष्ठा वाटप…

14

✒️ धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगांव(दि.13सप्टेंबर):- रोटवद तालुका धरणगाव येथे महाकॉट अभियानांतर्गत कृषी विभाग व आत्मा मार्फत गावातील शेतकऱ्यांना कापूस पिकात फेरोमन सापळे लावणे बाबत मार्गदर्शन किरण वायसे [ कृषी सहाय्यक ] यांनी केले.

यावेळी उपस्थित गावाचे सरपंच सुदर्शन पाटील तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कुराडे साहेब , गटाचे प्रतिनिधी अरुण पाटील ,दिपक पाटील , किरण पाटील व आत्मा बिटी एम दीपक नागपुरे व गावातिल शेतकरी वर्ग उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी कुराडे साहेब व गावाचे सरपंच सुदर्शन पाटील , दिपक नागपुरे आत्मा बिटीएम यांच्या हस्ते गावातील अजित 5 या कापूस वाणाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना चिकट सापळे व फेरोमन सापळे वाटप करण्यात आले.सदरिल गावात एक गांव एक वाण या अंतर्गत हे अभियान राबविले जात आहे.