कल्लकर्जाळ येथे २६८ ग्रामस्थांचा कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️अक्कलकोट(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अक्कलकोट(दि.14सप्टेंबर):-तालुक्यातील कल्लकर्जाळ येथे विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती.कल्लकर्जाळ येथे आयोजित केलेल्या कोविड १९ लसीकरण शिबिरात २६८ गावकऱ्यांना लस टोचण्यात आली असुन या लसी करण शिबिरास भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे.कल्लकर्जाळ या गावामध्ये १२ सप्टेंबर रविवार रोजी सरपंच विवेक चंद्रकांत ईश्वरकट्टी यांच्या विनंतीवरून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेड यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड लसीकरण यशस्वीरित्या पार पडले. आरोग्य खात्यातर्फे लसीकरण केल्यानंतर जर ताप आला तर कमी होण्यासाठी तापाच्या गोळ्या देण्यात आल्या.

आपला संदेश ग्रामस्थांना देताना सरपंच विवेक ईश्वरकट्टी म्हणाले की सर्वांनी कोरोना पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी. सरकार तर्फे देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊन स्वतःला सुरक्षित बनवण्याचे प्रयत्न करावे.पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी खूप कष्ट करत आहेत, त्यांना आपण साथ देऊन या महामारी वर आपल्याला विजय मिळवायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.या लसीकरणासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अर्जुन सिद्धापुरे , आरोग्य सेविका पालापुरे टी.के , आरोग्यसेवक कट्टीमणी एस.डी ,आशा स्वयंसेविका ,सर्व अंगणवाडी सेविका, सरपंच विवेक चंद्रकांत ईश्वरकट्टी, उपसरपंच , ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED