हिंदी राष्ट्रभाषा घोषित का होत नाही?

(भारतीय हिंदी भाषा दिन विशेष)

भारतामध्ये हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी तत्कालीन सरकार विशेष प्रयत्नशील होते. परंतु देशातील काही राज्यांकडून करण्यात आलेल्या विरोधानंतर हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. यासोबतच इंग्रजी भाषेलादेखील राजभाषा बनवण्यात आले आहे. त्यामुळे भारताची कोणतीही राष्ट्रभाषा नाही, असे बोलले जाते. परंतु ते विधान अगदीच निरर्थक आहे. जग अधिक जवळ येत असल्याने इंग्रजी अवगत असणे काळाची गरज आहे. मात्र हिंदीतून व्यवहार होण्यास जनतेची अधिक आग्रही भूमिका असावी, यास्तव हा कृष्णकुमार निकोडे गुरुजींचा महत्त्वपूर्ण विशेष लेख अवश्यच वाचावा. – संपादक_

“हर भाषा की सच पुछो जननी हिन्दी।
हमारे दिल की झाग धडकन हिन्दी।।
देश भक्ती-प्रेम का पाठ पढ़ाने वाली।
रिस्ते ‘श्रीकृष्णदास’ से निभाने वाली।।” (संतकवी ‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी)

भारतामध्ये १४ सप्टेंबर हा ‘राष्ट्रीय हिंदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारतामध्ये हिंदी भाषेतील सौंदर्य, त्यामधील साहित्य जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. भारत हा विविधतेमध्ये एकता व शांतता जपणारा देश आहे. या देशात जशी संस्कृती बदलते तशी भाषा व कृतीदेखील बदलते. कारण गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक तालुक्यात मागील अवघ्या १० महिन्यात १४ लोकांच्या नरडीचा घोट नरभक्षक वाघाने घेऊन ठार केले आहे. यामुळे शांतता भंग पावली आहे. नुकताच दि.११ सप्टेंबर २०२१ रोजी जेप्रा येथील शेतकरी स्वतःच्या शेळ्या शेतालगतच चारत असताना त्या वाघाने त्यास ठार केले. आजवर शांत व संयम राखून असलेले लोक वनविभागाप्रती संतापले आहेत. महिन्याला एक माणूस मारता मारता आता तो माणसाच्या रक्ताची चटक लागलेला वाघ दोन दिवसाआड माणसाचा मुडदा पाडत आहे, असो… उत्तर भारतासह बहुसंख्य राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते. राष्ट्रीय हिंदी दिवसाचे औचित्य साधून देशभरात सरकारी कार्यालयामध्ये खास कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.

याद्वारे हिंदी या भारताच्या राष्ट्रभाषेचा व राजभाषेचा प्रसार केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लागलीच दोन वर्षात म्हणजेच दि.१४ सप्टेंबर १९४९ या दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहलेल्या हिंदी भाषेचा भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिनानिमित्ताने दरवर्षी १४ सप्टेंबरला ‘भारतीय हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. कविवर्य महती गातात-

“पड़ने लगती है पियूष की शिर पर धारा।
हो जाता है रुचिर ज्योतिमय लोचन-तारा।
बर बिनोद की लहर हृदय में है लहराती।
कुछ बिजलीसी दौड़ सब नसों में है जाती।
आते ही मुख पर अति सुखद जिसका पावन नामही।
इक्कीस कोटि जन पूजिता हिन्दी भाषा है वही।” (अयोध्यासिंह उपाध्याय ‘हरिऔध’)

का बरे साजरा केला जातो १० जानेवारीला जागतिक हिंदी दिवस? हिंदी भाषेबद्दल काही काही गोष्टी फार मजेशीर आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी भाषेचे महत्त्व ओळखून पहिला हिंदी दिवस १४ सप्टेंबर १९५३ रोजी साजरा केला होता. भारतामध्ये हिंदी भाषेला राजभाषेचा मान देण्यासाठी इंग्रजी हटवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या पार्श्वभूमीवर देशात आंदोलन सुरू झाले. तामिळनाडूमध्ये जानेवारी १९६५मध्ये भाषावादावरून दंगलीदेखील उसळल्या होत्या.
इ.स.१९१८साली महात्मा गांधींनी हिंदी साहित्य संमेलनामध्ये हिंदी भाषेला राष्ट्रभाषा बनवण्याचा मानस बोलून दाखवला होता. हिंदी ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारताची ४४ टक्के जनता हिंदी बोलणारी आहे आणि देशात हिंदी भाषिकांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. कविराजांनी स्पष्ट केले-

“हिंदी हमारी आन है हिंदी हमारी शान है!
हिंदी हमारी चेतना वाणी का शुभ वरदान है!
हिंदी हमारी आत्मा है भावना का साज़ है!
हिंदी हमारे देश की हर तोतली आवाज़ है!
हिंदी हमारी अस्मिता हिंदी हमारा मान है!
हिंदी हमारी चेतना वाणी का शुभ वरदान है!” (सुनील जोगी)

सद्या सन २०२१साली इंटरनेटवर इंग्रजीच्या तुलनेत हिंदीचा वापर करणार्‍यांची संख्या वाढली आहे. सुमारे २०.१ कोटी जनता हिंदीचा वापर करू लागले आहेत. गुगलच्या माहितीनुसार हिंदी भाषेत माहिती वाचणाऱ्यात प्रतिवर्षी ९४ टक्क्यांनी वाढ होत आहे. तर इंग्रजी वाचणार्‍यांचा दर केवळ १७ टक्केच आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये टॉप ५ भाषांमध्ये हिंदीचाही समावेश आहे. दक्षिण पॅसिफिक मधील मेलानेशिया मधील फिजी नावाच्या आयलंडची हिंदी ही आधिकारिक भाषा आहे. त्याचा लहेजा अवधी भोजपुरीप्रमाणे आहे. जगात पाकिस्‍तान, नेपाळ, बांग्‍लादेश, अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, न्‍यूजीलैंड, संयुक्‍त अरब अमीरात, युगांडा, गुयाना, सूरीनाम, त्रिनिदाद, मॉरिशस, दक्षिण आफ्रीका समवेत अनेक देशांत हिंदी भाषिक आढळतात. म्हणूनच कविश्रेष्ठ लिहितात-

“एक डोर में सबको जो है, बाँधती वह हिंदी है; हर भाषा को सगी बहन जो, मानती वह हिंदी है।
उच्च वर्ग की प्रिय अंग्रेज़ी, हिंदी जन की बोली है; वर्ग-भेद को ख़त्म करेगी, हिंदी वह हमजोली है।
सागर में मिलती धाराएँ, हिंदी सबकी संगम है; शब्द, नाद, लिपि से भी आगे, एक भरोसा अनुपम है।
गंगा कावेरी की धारा, साथ मिलाती हिंदी है; पूरब-पश्चिम कमल-पंखुरी, सेतु बनाती हिंदी है।” (गिरिजा कुमार माथुर)

जगात १० जानेवारी या दिवशी ‘विश्व हिंदी दिवस’ देखील साजरा केला जातो. शासनाने जनतेच्या हिताचाही विचार केला पाहिजे. जसे- नरभक्षक वाघाने आजवर गोगाव, अडपल्ली, महादवाडी, कुऱ्हाडी, चुरचुरा, दिभना, जेप्रा, बाम्हणी, धुंडेशिवणी, इंदिरानगर, भिकारमौशी, कळमटोला आदी गावातील ५०च्या वर गुरे-बकऱ्या आणि १४ माणसांना ठार केले. अजूनही शासनाने त्याचा बंदोबस्त न केल्यामुळे तो धुमाकूळ घालतच आहे, संपूर्ण जिल्हा दहशतीत वावरत आहे. ही ढळू पाहणारी शांतता संबंधित प्रशासनाने तात्काळ सावरावी, हिंदीलाही राष्ट्रभाषा म्हणून घोषित करावे. अन्यथा विस्फोटक कृती घडू शकते. भारतामध्ये असलेली विविधतेत एकता व शांती ही शासन आणि जनतेच्या समन्वयामुळेच टिकून राहील, असे म्हणणे वावगे ठरता कामा नये!

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे राष्ट्रीय हिंदी दिनाच्या समस्त भारतीय देशभक्त बंधुभगिनींना आभाळभरून हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व शब्दांकन श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.[भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक व सारस्वत.]
मु. एकता चौक, रामनगर- गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली- ४४२६०५.व्हा. नं. ९४२३७१४८८३.

Breaking News

©️ALL RIGHT RESERVED