सिंदेवाहीत ऑल इंडिया पँथर सेनेची तालुका कार्यकारणी गठीत

32

🔸जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार व जिल्हा सल्लागार संतोष डांगे यांची उपस्थिती

🔹आक्रोश खोब्रागडे यांची तालुका अध्यक्ष तर युवा अध्यक्ष तथागत कोवले

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13सप्टेंबर):- महाराष्ट्रात पँथर वादळ घोंगावत असतांना जिल्ह्यातील वणी खुर्द येथे भानमती व जादूटोणा संशयावरून बौद्ध कुटुंबातुल महिलांना व पुरुषांना बांधून व डांबून मारल्याची घटना घडली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी होती. त्या घटनेच्या निषेधार्थ बंड करून उठणाऱ्यांचा आवाज कुठंतरी दडपण्याचा प्रयत्न केला जात होता. हे ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पँथर चे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांच्याशी संपर्क साधून त्या पीडितांच्या गावात जाऊन स्थानिक घटनास्थळी अन्याय घडलेल्या घटनेचा अभ्यास केला.

त्यात पोलीस यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांचेकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय हे लक्षात येताच पीडितांच्या न्यायासाठी संघर्षनायक दिपकभाई केदार व जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांच्या नेतृत्वाखाली पिडितांच्या न्यासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले. ही त्यांची माणसांप्रती आत्मीयता व अन्याया विरुद्ध लढण्याची आक्रमक भूमिका त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दाखवून दिली. मात्र जिल्ह्यातील कुठलाही स्थानिक कार्यकर्ते व सामाजिक संघटना हा त्या घटनेचा छडा लावण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठंतरी कार्यकर्त्यांची उणीव निर्माण झाली. व ती उणीव भरून काढण्यासाठी व जिल्ह्यातील दलित, शोषित, पीडित, वंचित, आदिवासी, मुस्लिम, बहुजन वर्गाच्या न्यायासाठी बंड करून उठायला ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रूपेश निमसरकार यांनी जिल्ह्यात संगठण मजबुतीकरणाचा पाया रचला. त्याच माध्यमातून ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्ह्याध्यक्ष रुपेश निमसरकार यांच्या नेतृत्वात सिंदेवाही तालुक्याची कार्यकारिणी गठीत करण्या संदर्भात बैठक घेतली व कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

त्यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून आक्रोश खोब्रागडे, उपाध्यक्ष जितेंद्र नागदेवते, उपाध्यक्ष महेंद्र कोवले, कार्याध्यक्ष अंबादास दुधे, महासचिव सुनील गेडाम, सचिव यशवंत खोब्रागडे, संघटक राजेंद्र गेडाम, सल्लागार डॉ.बांबोळे, मुख्य प्रवक्ता मुकेश शेंडे, प्रसिद्धी प्रमुख वीरेंद्र मेश्राम तसेच तालुका युवा कार्यकारणीमध्ये तालुका युवाध्यक्ष तथागत कोवले, युवा कार्याध्यक्ष उपकार खोब्रागडे, युवा महासचिव तेजेंद्र नागदेवते, संघटक मिथुन खोब्रागडे, युवा प्रसिद्धी प्रमुख विशाल गेडाम यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित निमंत्रक भैयाजी मानकर,विशेष अतिथी व जिल्हा सल्लागार संतोष डांगे साहेब, व सहकारी अतुल भडके, सत्यपाल मेश्राम व इतर सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन तथागत कोवले व आभार प्रदर्शन आक्रोश खोब्रागडे यांनी केले.ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अन्याय अत्याचार विरोधात पँथर संघटना ताकदीने उभी राहील जशास तसे उत्तर देण्यास सक्षमपणे पुढे जाईल व संघर्षनायक दिपकभाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल असे मत जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी स्पष्ट केले.