पालिकेच्या रुग्णालयाचा ढिसाळ कारभार, बेजबाबदार स्टाफ गाढ झोपेत, रुग्णांचा जीव मात्र टांगणीला

27

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

कल्याण(दि.13सप्टेंबर):– येथील शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयातील ढिसाळ कारभार तसेच बेजबाबदार स्टाफ यांच्या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बडेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

शनिवारी पहाटे चारच्या सुमारास रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे हे वडिलांच्या छातीत दुखत असल्याने आणि सारखी चक्कर येत असल्यामुळे त्यांना शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात घेऊन गेले होते. त्यावेळी रुग्णालयाच्या रात्रपाळीतील स्टाफ नर्स वर्षा या ओपीडी कॅबिन आणि लाईट बंद करून झोपलेल्या आढळल्या. तर वार्ड बॉय प्रतीक तयमली हे मद्य प्राशन करून बाहेरील बेंच वर झोपलेला आढळून आला. दरवाजा ठोकून नर्स यांनी दरवाजा उघडला नाही म्हणून वॉर्ड बॉय प्रतीक याला उठवण्याचा प्रयत्न केला असता प्रतीक याने आनंद नवसागरे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असल्याने सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत रिपब्लिकन सेनेचे शिष्टमंडळ यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी बडेकर यांना निवेदन दिले. त्यानंतर स्टाफ नर्स वर्षा व वॉर्ड बॉय प्रतीक यांकुले यांना मेमो देऊन निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव आयुक्त सूर्यवंशी यांना पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रिपब्लिकन सेनेच्य्या शिष्ठ मंडळामध्ये रिपब्लिकन सेनेचे वरिष्ठ नेते भगवान साळवी, पँथर रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे, कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जोशी, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष पीआर.तांबे, आनंद अंभोरे, नाना खैरनार, शैलेंद्र नेरकर, दीपक सोनवणे आदि पदाधिकारी उपस्थित होते. सदर प्रकरणामुळे पुन्हा एकदा शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाची निष्क्रियता चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.