पद्मा पुरस्कार साठी कृषी संशोधक दादाजी खोब्रागडे यांना मनोनीत करावे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13सप्टेंबर):-राज्यातील जागतिक कीर्ती प्राप्त कृषी संशोधक मा दादाजी खोब्रागडे रहिवासी नांदेड तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर खोब्रागडे यांचे शिक्षण तिसरी परंतु आल्या संशोधन प्रवृत्ती मुळे यांनी HMT आणि त्या सारखे अजून 8 धानाचे प्रजाती विकसित करून चंद्रपूर जिल्याचे आणि महाराष्ट्र चे नाव लोकीत केले.

त्यांच्या कार्य बघून अमेरिकेतील जग प्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मॅगझीन यांनी भारततील 7 प्रमुख उदयोजक मनून 2010 ला सम्मान दिला आहे.यांच्या कार्याला उचित मान सन्मान देण्या करीता आपणास महाराष्ट्रतील रहिवासी म्हणून पद्मा पुरस्कार साठी मनोनीत करावे अशी भावनायुक्त मागणी सर्वत्र होत आहे.

केंद्र सरकार च्या नवीन नियमा प्रमाणे मनोनीत करण्याकरीता ऑनलाईन खालील संकेतस्थळावर करायचे आहे.

https://padmaawards.gov.in/

वरील दिले संकेतस्थळावर ऑनलाईन द्वारे कसे मनोनीत करायचे याबाबत सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जास्तीजास्त प्रमाणात मनोनीत करावे जेणेकरून त्यांच्या कार्याला शासना कडून योग्य दखल मिळेल असे आवाहन खोब्रागडे यांच्या चाहत्यांनी केले आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED