प्रेस संपादक व सेवा संघ किनवटच्या पदाधिकाऱ्यांनी दिली उपजिल्हा रुग्णालयास भेट

34

✒️नांदेड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नांदेड(दि.13सप्टेंबर):-किनवट आदिवासी तालुक्यातील सर्वात मोठे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे आहे व तालुक्यातील अनेक पीएससी बऱ्याच अंशी बंद असल्यामुळे किंवा तेथील डॉक्टरच्या अनुपस्थितीमुळे ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे रुग्णांची प्रचंड गर्दी नेहमीच पाहायला मिळते या ठिकाणी एकूण १४ डॉक्टरची पदे मान्य असून ते दोन शिफ्टमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे एका शिफ्टमध्ये सात डॉक्टर्स कार्यरत असतात. परंतु यातील काही प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे याठिकाणी डॉक्टर्स अपुरे पडत आहेत.

सध्या डेंगू, मलेरिया, कावीळ, टाइफाइड व इतर आजाराने शेकडो लोक दररोज या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात परंतु सकाळच्या शिफ्टमध्ये दोनच डॉक्टर ओपीडीला हजर असल्यामुळे आणि ६०० ते ८०० रुग्ण याठिकाणी तपासण्यासाठी येत असल्यामुळे प्रचंड गर्दी होत आहे. तसेच दोन डॉक्टर्स वर मोठा ताण येत आहे. तसेच ओपीडीचा सकाळी ९ ते १२ वाजेपर्यत वेळ आहे. परंतु डॉक्टर्स उशिरा येतात त्यामुळे रुग्णांना कमी वेळ मिळतो. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोश दिसून येत आहे. तसेच येथील रुग्णांना वागणुक चांगली मिळावी अशी अपेक्षा रुग्णांची आहे. किनवट तालुक्यातील खासदार, आमदार असलेले लोकप्रतिनिधी या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्याची खंत येथील जनता आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवत आहेत तसेच किनवट येथील कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे असे येथील रुग्णांनी बोलून दाखवले.

तेव्हा येथील डॉक्टरची व अपुऱ्या असलेल्या स्टाफची पूर्ण भरती करण्यात यावी यासाठी खासदार आणि आमदारांनी प्रयत्न करावेत आणि गोरगरिबांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावे असे रुग्णाचे म्हणणे आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी यांनी या रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक उत्तम धुमाळे यांची भेट घेऊन त्यांना या सर्व समस्या अवगत करून दिल्या. त्यावर त्यांनी मी ही प्रभारीच आहे त्यामुळे माझे हे कर्मचारी ऐकत नाहीत आम्हाला पुरावा द्या किंवा लेखी तक्रार द्या. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन पत्रकारांना दिले तसेच रुग्णालय स्वच्छतेसाठी आमच्याकडे मनुष्यबळ अगदी नगण्य असून एक-दोन कर्मचाऱ्यावर सर्वकाही चालू असल्यामुळे शक्यतो आम्ही स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतो परंतु आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याचे प्रभारी अधीक्षक उत्तम धुमाळे यांनी सांगितले. तेव्हा लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष देऊन उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे मनुष्यबळ कसे वाढवता येईल याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

आपल्या सूचना अंमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू असे प्रभारी अधीक्षक डॉ. धुमाळे यांनी सांगितले.याप्रसंगी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका सचिव नसिर तगाले,ता.उपाध्यक्ष राजेश पाटील, तालुका सहसचिव प्रणय कोवे प्रसिद्धीप्रमुख गंगाधर कदम, सहकोषाध्यक्ष मारोती देवकते, तालुका संघटक राज माहुरकर, सदस्य रमेश पारचके, विशाल गिम्मेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.