श्री अण्णाप्पा खामलेहत्ती यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

29

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.13सप्टेंबर)’:-संभाजीनगर येथील सामाजिक चळवळचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्री अण्णाप्पा मल्लप्पा खामलेहत्ती यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा,ना, छगन भुजबळ साहेब यांच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करणेत आली.

सदर निवडीचे पत्र जिल्हा कार्याध्यक्ष श्री दादासाहेब चोपडे यांनी दिले, निवडी वेळी जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती शितल तिवडे,महिला शहर अध्यक्षा सौ स्वाती काळे, लहुजी शिंदे, सुनील मेटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.