सडोली खा येथे कोविड योध्यांचा सन्मान करून जपले समाजभान

24

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.13सप्टेंबर):-सडोली खा येथील शिवतेज तरुण मंडळाने आज अखेर ऐतिहासिक सजीव देखावे सादर करून सांस्कृतिक वारसा जपला आहे.वृक्षारोपण, महापूर व कोरोना काळात गरजूना मदत, दरवर्षी आषाढी एकादशीला प्रसाद वाटप, ग्राम स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती कार्यक्रम इत्यादी उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला आहे.

या वर्षीच्या कोरोना महामारीच्या काळात मंडळाने गणपती उत्सवाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन कोरोना योध्यांचा सन्मान केला. यामध्ये वैद्यकीय अधिकारी,अंगणवाडी सेविका, दाई, आशा वर्कर्स, शिक्षक, ग्रामपंचायत कामगार इ नी कोरोना काळात केलेल्या सेवेचा कृतज्ञता पूर्वक सत्कार शाल व कलमी आंब्याचे सुंदर रोप देऊन करण्यात आला.यावेळी अंगणवाडी सेविका सौ कांचन मगदूम यांनी सर्वानी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे व सर्वानी कोविड डोस वेळेत घ्यावेत असे आवाहन केले. म गांधी व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून व्यसनमुक्ती बद्दल प्रबोधन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शंकर पाटील तर प्रमुख पाहुणे प्रताप तिवारी हे होते. प्रास्ताविक रामदास पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन इंद्रजित निमकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्जेराव पाटील, कृष्णात पाटील,बाजीराव पाटील, संजय पाटील, अजित बुवा,यशवंत दिंडे, काशीनाथ पाटील,जयदीप मोरे ,भिकाजी पाटील,अशोक मगदूम यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार सागर ढेंगे यांनी मानले.