कृषीकन्येने पशुलसीकरणा बद्दल मार्गदर्शन केले

28

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.13सप्टेंबर):-महागांव येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत, कृषी महाविद्यालय उमरखेड , ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ७ व्या सत्रातील कृषी कन्या कु. प्रतिक्षा भारत श्रुंगारे हिने पशुलसीकरणाबाबत शेतकरी पशुपालकांना मार्गदर्शन केले.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. पाऊस पडला की जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात जनावरांची काळजी काळजी कशी घ्यावी.
याबदल माहिती सांगण्यास सुरुवात केली.

रोगांची व आजारांची लक्षणे दिसताच पशुलसीकरण करावे व त्यांना कुठला संतुलित आहार दयावा या बद्दल पशुपालकांना मार्गदर्शन करून तसेच जनावरांमध्ये प्रत्येक म्हैसपालकाने म्हशीचे दूध उत्पादन नियमित व योग्य राहण्याकरिता म्हशींना निरोगी व सुदृढ ठेवणे आवश्यक आहे.

म्हशीवरील विविध आजार दुग्धज्वर, किटोसीस, घटसर्प तोंडखुरी किंवा लाळ खुरकुल व सरी अशा विविध आजारांबद्दल योग्य ती माहिती कृषी कन्या कु. प्रतिक्षा भारत श्रुंगारे हिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमा दरम्यान पशुवैद्यकीय सल्लागार व पशुपालक काशीनाथराव नरवाडे, निरंजन नरवाडे, अक्षय कदम जयश्री नरवाडे, रंजना नरवाडे उपस्थित होते.

याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.एस. के चिंतले, पशुसंवर्धन विभागाचे प्रा. एस. व्ही देशमुख व ग्रामीण, कार्यानुभव अधिकारी प्रा. सपकाळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.