राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक शेख शफी यांचा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सत्कार

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि. 13 सप्टेंबर):-शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध उपक्रम राबवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नाळ जगाशी जोडणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा मानला जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी कडून दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील आयटीसी पुरस्कार विजेते शिक्षक शफी शेख यांचा सत्कार सोहळा ढाणकी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला होता,बिटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शफी सर ढाणकी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची माजी शिक्षक आहेत,आपल्या सोळा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राष्ट्रीय, राज्य, जिल्हास्तरीय ,असे विविध पुरस्कार पटकावले आहेत.

शिक्षण क्षेत्रात शेख शफी सर यांची वेगळी ओळख आहे त्यांनी नवनवीन आधुनिक उपक्रमांचा अवलंब करून शाळेत महत्वपूर्ण बदल घडविले आहेत, त्यांनी राबविलेल्या विविध उपकामाबद्दल आणि केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ,त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढाणकी,
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, जॉन्टी उर्फ प्रशांत विणकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती चे अशोक मोरे, अनिल गायकवाड, संतोष मंतेवाड, प्रेम धनवर उपस्थित होते.

मुख्याध्यापिका श्रीमती जवळकर मॅडम यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांचा डायरी आणि पेन देऊन सन्मान केला.

यावेळी बचाटे सर, शेळके सर केंद्रे सर, इरलेवाड मॅडम, पालेपवाड मॅडम, शिनकरे मॅडम, प्रतापवार सर, इत्यादी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कुंभरवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन काळे सर यांनी मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED