गजानन च्या अडीअडचणीत सदैव पाठीशी राहील – आक्रम सौदागर

🔹मुस्लिम समाजाच्या वतीने नेमबाज गजानन चा सन्मान

✒️तलवादा प्रतिनिधी(शेख आतिख)

तलवाडा(दि.13सप्टेंबर):- गावचा रहिवाशी युवक महाराष्ट्रात होणाऱ्या स्टेट लेव्हल च्या स्पर्धेत आपल्या गावचे नाव मोठे करत असून आम्हला त्याचा सार्थ अभिमान आहे गजानन च्या पाठीशी मी सदैव राहील असे मत राष्ट्रवादी कॉग्रेस सेवादल चे गेवराई तालुकाध्यक्ष तथा उपसरपंच आक्रम सौदागर यांनी सत्कार कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले व 21 हजाराची रक्कम जेष्ठ शफीशेठ सौदागर,खमरखा पठाण,कदिरभाई,बळीराम आण्णा शिंदे व मदतगार आक्रम सौदागर यांच्या हस्ते सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत सुपूर्द केली.

गजानन खंडागळे ला आर्थिक आधाराची गरज असल्याचे सर्व गावकऱ्यातून बोलले जात असतांना अनेकांनी मदतीचा शब्द दिला आहे आणि मदत नक्की करूत हे सांगितले यामध्ये तलवाडा गावचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी कॉग्रेस सेवा दल गेवराई तालुकाध्यक्ष यांनी ही ग्रामपंचायत मध्ये सत्कार करतांना एकवीस हजार मदर जाहीर केली आणि ती दिली ही सर्व समाजाच्या वतीने माळी गल्ली,मुस्लिम मोहल्ला याठिकाणी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करून जेष्ठ मान्यवर व्यक्तीच्या हातून मुलगा व त्याचे वडील शहादेव खंडागळे यांच्या कडे मदत सुपूर्द केली व मी सदैव गजानन च्या पाठीशी राहील असे मत व्यक्त केले.

यावेळी जेष्ठ शफीशेठ सौदागर,खमरखा पठाण,कदर भाई ग्रामपंचायत सदस्य बळीराम अण्णा शिंदे,समता परिषद तालुकाध्यक्ष बापू गाडेकर,पत्रकार तथा संत रविदास प्रतिष्ठान चे अध्यक्ष तुळशीराम वाघमारे, पत्रकार तथा पोलीस बॉईज संघटना पत्रकारिता बीड जिल्हाअध्यक्ष अल्ताफ कुरेशी,पत्रकार डॉ सुरेश गांधले, दादाराव रोकडे,खतीब कदिरभाई,शेख अप्सरा,अरुण डोंगरे,शेख मोहसीन, सोमनाथ काळे यांच्यासह मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक
©️ALL RIGHT RESERVED