पाणी वापर संस्थेची आढावा बैठक संपन्न

23

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुर(दि.14 सप्टेंबर):-गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पावरील ब-१ शाखेचे लाभ क्षेत्रातील असलेल्या पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांची खरीप हंगाम २०२१-२२ करीता सिंचन आढावा बैठक गोसेखुर्द धरण विभाग वाही वाही अंतर्गत ब्रम्हपुरी येथील विठ्ठल रूख्मीनी सभागृह, कुर्झा वार्ड येथे नुकतीच पार पडली.सदर बैठकीस अध्यक्ष म्हणून गोसेखुर्द धरण विभाग वाही चे उपविभागीय अभियंता दिलीप खोरगडे उपस्थित होते. यावेळी निमजे, मेश्राम, ठाकूर, वैद्य, अर्थशास्त्र विषयक संस्था मुंबई इंगळे,पवार, पाणी वापर संस्थेचे संस्थापक ओझा, पौनिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी इंगळे यांनी उपस्थितांना महाराष्ट्र सिंचन कायदा २००५ अन्वये दिलेल्या अधिकारा विषयी विस्तृत माहिती दिली. तर पाणी वापर संस्थेचे ओझा यांनी पाणी वापर संस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने सिंचन विषयक महत्त्व विषद करून पाणी पट्टी भरणा करून सिंचनासाठी पाणी कसे आरक्षीत करता येईल याविषयी आपले मत व्यक्त केले. सदर बैठकीस १८ पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.प्रसंगी पाणी वापर संस्थेच्या आडसर येणार्‍या समस्यांचे जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता खोरगडे यांनी निरसण केले. सदर बैठकीचे संचालन पवार यांनी केले. तर आभार पौनिकर यांनी मानले.