ना वर्गणी,ना सजावट,ना अवाढव्य मूर्ती ..सर्वच बाबींना तिलांजली..विविध खेळांनी उधळला आनंदाचा रंग

32

🔸खाऊच्या पैशातून केली “श्री”स्थापना..

🔹चोपड्यात बालिकांच्या दामिनी गणेश मंडळाने केला नवा आदर्श उभा..!

✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चोपडा(दि.१४सप्टेंबर):-गतवर्षी कोरोनाच्या थयथयाटाने गणपती बाप्पाच्या आगमनावर विरजण पडले होते.यंदा मात्र नियमांच्या चौकटीत गणरायाची स्थापना झाली असून उत्सवाच्या आनंदाला उधाण आले आहे.एरवी गणरायाच्या स्थापना दिवसाची चातकाप्रमाणे वाट बघणाऱ्या तरुणांचा सोबत युवतींनीही पुढाकार घेऊन गणेशाच्या उत्सवात भर पाडण्याचे कार्य हाती घेतले आहे.त्याचे पडसाद चोपडा शहरातील महावीर नगरात उमटले आहेत.या काॕलनीत बालिकांनी पुढाकार घेऊन “श्री”ची स्थापना करून परिसरात अनेकांना धक्का दिला आहे.

.”दामिनी गणेश मंडळ’ नावाच्या बॕनरखाली ना वर्गणी,ना सजावट,ना अवाढव्य मूर्ती,ना गवगवा अगदी साधेपणाने पैशांच्या उधळणाला तिलांजली देत वर्षेभर खाऊच्या जमा झालेल्या पैशात हर एक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य चाफा खुलविण्यात आघाडी घेऊन खऱ्या अर्थाने “श्री”ची स्थापना करून ठसा उमटविण्याचे अनोखे काम या बालकांनी करून दाखविल्याने अनेकांचे बोट तोंडात गेल्याचे चित्र रेखाटले गेल्याने या बालिकांचा आदर्श तेचे गोडवे हर घरात गायिले गेल्याने सर्वांनीच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली आहे.
वास्तविक गणेशाची स्थापना करण्यासाठी गल्ली पासून दिल्ली पर्यंत लक्ष्मी गोळा करण्याचे काम बहुतांश गणेश मंडळे करीत असतात शिवाय मूर्तीच्या उंची पासून तर सजावटीपर्यंत लाखों रुपयांची उधळण करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

मात्र चोपड्याच्या दामिनी गणेश मंडळ म्हणून उदयास आलेल्या गणेश मंडळातील ना बालिका मुलींनी कोणाकडून एक छदामही निधी जमा न करता खाऊच्या जमा झालेल्या निधीतूनच विविध स्पर्धकांना विशेष बक्षीसे ही दिलीत.रात्री सर्व महिला-पुरूषांना ,बालक वर्गाला घरोघरी जाऊन बोलवून एकत्र करून संगीत खुर्ची, लिंबू-चमचा,सुई-धागा,, डान्स, दांडिया व टीकली मारा आदी स्पर्धा घेऊन सामाजिक एकोपाचा अन् हर्षोल्लासाचे मानकरी ठरले.अत्यंत कमी वयात आदर्श विचारांचा पाढाच या बालिका न कळत शिकवून गेल्या.कोरोनासारख्या भयावह परिस्थितीत पैशांचा अपव्यय न करता खूप काही आनंद लूटता येतो हे समाजाला एक प्रकारे या बालिंकांच्या कृतीतून सिद्ध झाले आहे या दामिनी गणेश मंडळांची धूरा रोशनी रोहित सोनार,निरमा तांबाराम चौधरी, जान्हवी मराठे, स्नेहा गिरासे,सोनाक्षी महेश शिरसाठ, स्वामिनी रोहित सोनार,ईशिता महेश शिरसाठ,लावण्या संतोष साळूंके या१०ते१४वर्षे वयाच्या मुलींनी सांभाळली आहे. खरंच चोपडा वासियांसाठी ह्या मंडळाच्या सदस्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.. म्हणून सुभाषितकारांनी म्हटलेले” मूर्ती लहान कीर्ती महान ” याचा प्रत्यय या बालिकांतून जाणवला एव्हढे मात्र खरे..!