वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

109

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)

पुसद(दि.14सप्टेंबर):-मांडवा येथील ग्राम परिवर्तन समितीच्या वतीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्त स्मशानभूमीत अथवा गावातील सार्वजनिक ठिकाणी किंवा आपल्या खाजगी जागेत एक तरी वृक्ष लावून आपला वाढदिवस साजरा करावा असे आवाहन ग्राम परिवर्तन समिती या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले होते.

त्याच अनुषंगाने युनिव्हर्सल अकॅडमी पुसदचे संचालक तथा मांडवा येथील उच्चशिक्षित प्रा.डॉ. सागर उर्फ दादाराव साखरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा अनाठाई खर्च टाळून मांडवा येथील स्मशानभूमीमध्ये चिंच, आंबा, तसेच इत्यादी प्रजातीच्या वृक्षाचे रोपण करून आपला वाढदिवस साजरा केला.याकार्याबद्दल ग्राम परिवर्तन समितीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रा.डॉ. सागर उर्फ दादाराव साखरे, मांडवा कृषी समन्वयक बाळु पुलाते,प्रतिक साखरे तसेच ईत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.