नाशकात वंचित बहुजन आघाडी आढावा बैठकी दरम्यान स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचा वंचित मध्ये पक्षप्रवेश

✒️नाशिक प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.14सप्टेंबर):-नाशिक येथे वंचित बहुजन आघाडी ची आढावा बैठक जिल्हा अध्यक्ष पवनभाऊ पवार यांच्या उपस्थितीत नाशिक येथील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी शिवराय ,फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांचा प्रतिमांना अभिवादन करण्यात आले तसेच नवनिर्वाचित कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आला.

त्यावेळी येवल्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन चे राम कोळगेसह मुकतारभाई तांबोळी, प्रभाकर गरुड, शशिकांत जगताप यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्षात प्रवेश घेतला
वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य असून इतर गटा तटात काम करण्यापेक्षा आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे यावेळी राम कोळगे,शशिकांत जगताप यांनी आश्वासन दिले.

यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष पवनभाऊ पवार , नाशिक शहराध्यक्ष राहुल पटेकर, भारत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये येवल्यातील कार्यकर्त्यांनी वंचित पक्षप्रवेश केला यावेळी संजय पगारे, प्रभाकर गरुड, दयानंद जाधव, मुक्तारभाई तांबोळी, राम कोळगे, भाऊसाहेब जाधव, दीपक गरुड, नाना पगारे, शशिकांत जगताप नितीन जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED