मांडवा येथील युवक चार दिवसांपासून बेपत्ता

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.14सप्टेंबर):- तालुक्यातील मांडवा येथील युवक विश्वजित उर्फ गंगा गणेश आडे हा दि.११ सप्टेंबर पासुन बेपत्ता आहे. वय २२ वर्ष, रंग गोरा,उंची १७० सि.मी.आहे.

हा युवक मांडवा येथून दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे १० वाजता पासून घरून निघून गेला आहे. घरच्या व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतले असता कुठे ही त्यांचा थांगपत्ता लागला नाही.त्यामुळे ग्रामीण पोलीस स्टेशन पुसदला हरविल्याबाबत तक्रार दि.१३ सप्टेंबर रोजी दाखल केली आहे.
सदर युवक हा कोणाला आढुळन आल्यास या ९९२२८५८४८२ मोबाईल नंबर संपर्क करावा .