सुवर्ण महोत्सवी शाळेत ” हिंदी दिवस ” साजरा….

30

🔹संत कबीर यांना केले अभिवादन !…..

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.१४ सितंबर):-२०२१ मंगळवार रोजी स्थानिय सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल मध्ये हिंदी दिवस समारोह साजरा करण्यात आला….याप्रसंगी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. पी.आर.सोनवणे मॅम व शाळेच्या ज्येष्ठ हिंदी शिक्षिका सौ. एम.के. कापडणे यांच्या हस्ते हिंदी भाषाचे महान संत कबीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

हम सबका अभिमान है हिंदी !….
भारत की शान हिंदी !…..
असे म्हणत हिंदी विषय शिक्षिका एम.के.कापडणे मॅडम यांनी सर्व शिक्षक बंधू – भगिनींना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

हिंदी दिवसाचे औचित्य साधून हिंदी विषय शिक्षक पी.डी.पाटील यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले.यावेळी शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार , सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी शाळेतील सर्व शिक्षक बंधु – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.