चिखली बलात्कार प्रकरणातील आरोपीला गजाआड करा – आ सौ श्वेताताई महाले पाटील

✒️विशेष प्रतिनिधी(अंबादास पवार)मो:-9561905573

चिखली(दि.14सप्टेंबर):- बुलढाणा जिल्हामधील
चिखली येथील मेव्हणीला वाढदिवसाचे गिफ्ट घेवून देतो असे म्हणून जावयाने कारमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी जावई अजूनही पोलिसांना सापडला नाही हे पोलिसांचे अपयश असून आरोपीला तातडीने गजाआड करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौ सिंधुताई तायडे सभापती पंचायत समिती , श्री पंडितदादा देशमुख शहराध्यक्ष ,श्री डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष ,सौ सुनीता ताई भालेराव शहराध्यक्ष महिला मोर्चा, सौ व्दारकाताई भोसले तालुका अध्यक्षा महिला मोर्चा , शेख करामत भाई जिल्हा अध्यक्ष मुस्लिम सेवा संघ ,सागर पुरोहित शहराध्यक्ष युवा मोर्चा यांनी मा तहसीलदार व चिखली चे ठाणेदार यांना निवेदन देऊन करण्यात आली

दि 14 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखली येथील माळीपुरा भागातील १६ वर्षीय मुलीचा २० ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त जालना येथील तिचा जावई चिखलीत आला व तिला गिफ्ट घेवून देतो, असे म्हणून तिला दुचाकीवर घेवून गेला व शहरातील डीपी रोडवरील गिफ्ट सेंटरमध्ये घेवून गेला. गिफ्ट घेतल्यानंतर जावयाने घरी न सोडता दुचाकी मेहकर फाट्याकडे वळवली व शिवाजी उद्यानामागील असलेल्या आधीपासूनच उभ्या असलेल्या कारमध्ये तिचे तोंड दाबून कारमध्ये टाकले व कार जालन्याकडे पळविली. यावेळी जावयाने प्रथम कारमध्येच मेहूणीवर लैंगीक अत्याचार केला व जालना येथे पोहचल्यावर लॉजवर रुम करण्याचा प्रयत्न केला होता.

घटनेची माहिती मिळताच SP सोबत बोलून आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. या घटनेची माहिती मिळताच आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी पोलिस निरीक्षक , पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलून आरोपीला तातडीने बेड्या ठोकण्याचे सांगितले होते . प्रकरण गंभीर व संवेदनशील असून आरोपी नातेवाईक असूनही पीडितेच्या कुटुंबियांनी मोठ्या हिमतीने तक्रार केलेली आहे याची सुद्धा जाणीव करून दिली होती .

या दुर्दैवी व घृणास्पद घटनेला २५ दिवस होऊन सुध्दा आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही .
अगोदरच बदनामीच्या भीती पीडिता व तिचे कुटुंब अशा प्रकरणात तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही . या प्रकरणात जावईच आरोपी असल्याने आणि पिडिता ही मेव्हणी आहे. जावयाच्या विरोधातच तक्रार असल्याने पीडितेच्या बहिणीचे कौटुंबिक आयुष्य उध्वस्त झालेले आहे. घटना घडल्यानंतर पीडितेची बहीण म्हणजेच आरोपीची पत्नी सासर सोडून माहेरी आली . त्यानंतर अत्याचार झाल्याची तक्रार देण्यात आली .

पोलीसांना आरोपी कोण आहे हे माहीत असताना ही आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही.सदर प्रकरण एव्हढे गंभीर आणि संवेदनशील असतांना या घृणीत घटनेची कुठेही वाच्यता झाली नाही ना कुठल्या एवढ्या गंभीर घटनेची गुप्तता ठेवून पोलिसांनी किमान आरोपींना तरी अटक करून बेड्या ठोकायला हव्या होत्या. मात्र दिवसाढवळ्या रस्त्यावर वाहनामध्ये बलात्कारासारखे क्रूरकर्म करणारा गुन्हेगार व त्याला साथ देणारा चालक अद्यापही मोकाट असल्याने सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे . त्यामुळे युद्धपातळीवर कारवाई करून आरोपीला तातडीने अटक करून ही केस सुद्धा जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी सुद्धा मागणी करण्यात आली..

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED