हिंदी भाषेने राष्ट्राला समृद्धी दिली – प्रा.जे.एम.पठाण

23

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.14सप्टेंबर):-सर्व भाषा ह्या भगिनी आहेत.प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात.त्या भाषा प्रांताचे वैभव निर्माण करतात.हिंदी राष्ट्राला जोडणारी भाषा आहे.हिंदी भाषा प्रत्येक देशात बोलली जाते.हिंदी भाषेने राष्ट्राला समृद्धी दिली.असे प्रा.जेे.एम.पठाण यांनी विचार व्यक्त केले.

आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात हिंदी दिवस निमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल सेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने यांच्या मार्गदर्शनात,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या अध्यक्षतेखाली उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,आविनाश कंदले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा.शुभांगी खुडे,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रा.ज्ञानेश्वर नवले,प्रा.अशोक भोगाडे,प्रा.सुहास गोपने,प्रा.डॉ.अभय शिंदे,डॉ.निवृत्ती नानवटे,डॉ.भगवान वाघमारे आदी उपस्थित होते.डॉ.सखाराम वांढरे यांनी सर्वांचे आभार मानले.