✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.15सप्टेंबर):-राष्ट्रीय समाजवादी पार्टी एन एस पी या राजकीय विचारधारेच्या प्रवाहात एक नवे नेतृत्व भारत अगेन्स्ट करप्शन चे संस्थापक धनगर आरक्षणाचे समर्थक ज्येष्ठ नेते राजकीय नेतृत्व म्हणून पार्टीच्या राष्ट्रीय परिषदेवर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून श्री हेमंतजी पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे.हेमंतजी पाटील यांचे स्वागत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार हेमंत कुमार केळकर यांनी केले, धनगर आरक्षणाची मूळ मागणी हेमंत पाटील यांची त्यासाठी ते प्रदीर्घ लढा देत आहेत.

परंतु समाजातील काही भामट्यांनी हेतुपुरस्सर समाजाला गृहीत धरून समाजाची दिशाभूल केली आणि आता ते भामटे केवळ विदूषक बनले आहेत समाजहित बाजूला सारून फुकटच्या प्रसिद्धीसाठी आरोप-प्रत्यारोप करत आहेत माझ्या समाजाला समाजवादाची जोड देऊन समाजहित साधेल असा निर्धार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला साक्षी मानून हेमंतजी पाटील यांनी केला आहे, यात ब्राह्मण समाज व मराठा समाज हेमंत पाटील यांच्या बाजूने एकवटला असून महाराष्ट्रतील येणाऱ्या सर्व निवडणुका लढून धनगर समाजाची ताकद दाखवून देऊ असा इशारा सत्ताधारी व विरोधकांना दिला आहे.यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मधून राष्ट्रीय समाजवादी पार्टी मधे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी मा सौ दीपा अग्रवाल यांनी पक्ष प्रवेश केला.*

सेना-भाजपा मधून अनेक नेते एन एस पी प्रवेशासाठी आमच्या संपर्कात आहेत असे संकेत अभिजीत आपटे यांनी दिले* तसेच माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी सलीम शेख तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी मांडवा पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी रंगकर्मी आंदोलनाचे प्रमुख व सातत्याने कलाकारांचे प्रश्न हाताळणारे शिवा बागुल यांना पाठिंबा देताना लोक कलावंत नाटक चित्रपट क्षेत्रावर उपासमारीची वेळ आली असून सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना त्या विवंचना दिसत नाहीत याबद्दल खंत व्यक्त केली तसेच रंगकर्मी आंदोलनास श्री शिवा बागुल यांच्या उपस्थितीत पाठिंबा दिला तसेच सौ मनीषा घाटे यांना कोव्हीड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब एडके यांनी केले तर प्रस्तावना अभिजीत आपटे यांनी दिली यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष महेंद्र शेलार, राष्ट्रीय महासचिव लक्ष्मण चांदेरे, कोषाध्यक्ष उत्कर्ष शहा, पोलीस मित्र असोसिएशन तसेच माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी मुळीक, प्रदेश उपाध्यक्ष महादेव चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष दीपा अग्रवाल, माहिती अधिकार पत्रकार महासंघाचे योगेश पांडव, चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश सचिव अजित दादा पवार, बांधकाम कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष शरणाप्पा हळीझोळ, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर आशिष ढोक सांगली जिल्हाध्यक्ष तेजस कारंडे, अभिनेत्री आसावरी कुलकर्णी, संतोष शिखरे, सागर वाणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते

पुणे, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED