सरकार, प्रशासन, कोणी लोकप्रतिनिधी नव्हे तर संतोष मुरकुटे स्वखर्चातून बुजवणार परळी नाका ते दत्त मंदिर पर्यंतचे खड्डे

35

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

नांदेड(दि.15सप्टेंबर):- पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या शहरातील परळी नाका ते दत्तमंदिर पर्यंतच्या महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळणी झाली असून . अनेक वाहनधारकांसह नागरिकांना या जीवघेण्या खड्ड्यांमुळे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. हे जीवघेणे खडे बहुजवाण्या साठी अनेक निवेदने, तक्रारी होऊनही सुद्धा झोपिचे सोंग घेतलेले संबंधित विभाग व अधिकाऱ्यांनी या रस्ता दुरुस्तीसाठी कुठलेच प्रयत्न करीत नसून . अखेर शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे यांना वाली मिळाला असून यासाठी सरकार, प्रशासन अथवा कुठल्या लोकप्रतिनिधीने नव्हे तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे युवानेते संतोष मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागास मंगळवारी दि.१४ सप्टेंबर रोजी निवेदन देत आपण स्वखर्चातून परळी नाका ते दत्त मंदिर पर्यंतचे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे स्वखर्चातून बुजवण्यासाठी पत्र देत परवानगी मागितली आहे. 

        संतोष भाऊ मुरकुटे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे युवानेते संतोष मुरकुटे यांनी मंगळवारी दि.१४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागास लेखी पत्र दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गंगाखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर परळी नाका ते दत्तमंदिर पर्यंत खूप मोठे- मोठे जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. मागील सहा महिन्यात खड्डे बुजवण्याची तसदी शासन, प्रशासनाने अथवा कुठल्याही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेऊन सोडवली नसल्याने आपण स्वतःला स्वखर्चातून शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवणार असल्याचे म्हटले आहे.

———
@ नागरिकांचा त्रास थांबावा हाच उद्देश – संतोष मुरकुटे

      शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत असून वेळप्रसंगी खड्डे वाहनधारक व नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.

परिणामी यापुढे तरी नागरिकांचा त्रास वाचावा म्हणून आपण जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परळी नाका दत्त मंदिर पर्यंतची खड्डे स्वखर्चातून बुजवण्यासाठी परवानगी मागितली आहे.