अॅट्रॉसीटी गुन्ह्यातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या एपीआय दहिफळे यांना बडतर्फ करा -सर्वपक्षीय मागणी

60

🔸लाडेगावच्या अन्यायग्रस्त बौध्द कुटूंबाला साथ देण्यासाठी केज तालुक्यातील दलित संघटनांनी बांधली वज्रमुठ.!

🔹गटतट बाजुला ठेवून अन्यायग्रस्तांना खंबीरपणे साथ देण्याचा बैठकीत एकमुखी निर्णय.

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि15सप्टेंबर):-दलितावरील अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत असुन अॅट्रॉसीटी सारख्या गंभिर गुन्ह्यातील गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. पोलीस प्रशासन मात्र त्यांना पाठीशी घालत असल्याने या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. केज तालुक्यातील लाडेगाव येथील शासकीय गायरान कास्तकरी बौद्ध समाज अशाच घटनेनी भयभित झाला असुन अन्याय करणाऱ्यांनीच त्यांचेवर दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करून विनाकारण बौद्ध समाजातील सुशिक्षित तरुणांना अडकवले जात असल्याने आता केज तालुक्यातील दलीत संघटना, पक्ष यांनी एकत्र येत गटतट बाजुला ठेवत लाडेगावच्या अन्यायग्रस्त बौद्ध कुटुंबाला खंबीरपणे साथ देण्याचा निर्णय काल केज येथील सर्वपक्षिय बैठकीत घेण्यात आला.

या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील मौजे लाडेगाव येथील शासकीय गायरान जमीन सर्वे नंबर १४३ मधील एक्कर हे क्षेत्र याच गावातील २२ बौद्ध कुटुंबांनी १९८३ पासून वहीती केली आहे. याच गावातील काही मनुवादी विचारसरणीच्या गावगुंडाना खपले नाही.आणि त्यांनी जाणुनबुजून या कास्तकरी बौद्ध कुटूंबाला त्रास देण्याचे कटकारस्थान १९९० पासून सुरुवात केली. गेल्या वर्षी बौध्द कुटुंबाने या शासकीय गायरान जमिनीत रब्बी पिकाची पेरणी केली होती. त्यावेळेस देखिल शासनाच्या आदेशानुसार अतिक्रमण केल्याचे कारण दाखवत न्यायालयाने निकाल दिल्याचे भासवुन ऊभ्या पिकाशर नांगर फिरवला होता. त्यावर या वर्षी देखील या बौध्द समाजाच्या लोकांनी पुन्हा खरिपाची पेरणी केली पिकेही जोमदार आली होती. परंतु या गावातील गावागुंडांनी पुन्हा पहिलीच शकल वापरून जेशीबी व ट्रक्टर हि वाहने रात्रीच्या अंधारात ऊभ्या पीकात घालून पिकांची नासाडी करून सदरील गायरान जमीनीवर राहण्यासाठी तयार केलेल्या झोपड्याही जाळून टाकल्या. व हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने त्यांच्या विरोधात बौद्ध समाजाने अॅट्रॉसीटी अॅक्ट नुसार २५ जणावर गुन्हा दाखल केला. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी हे प्रकरण ऊलटे हाताळले असुन खरे गुन्हेगार मोकाट सोडून खोट्या आरोपात बौध्द समाजातील तरूणांना पोलिस पिंजऱ्यात टाकले.

जात असुन या समाजाला गावात येण्यास मज्जाव करत त्यांचेवर बहिष्कार टाकल्याने व हा समाज भयभीत झाला असुन अनेक अडचणी चा सामना करावा लागत आहे.
याची केज तालुक्यातील सर्व दलित संघटना , पक्ष व अन्य समाज बांधवांनी एकत्र येत वैयक्तीक गटतट बाजूला ठेवुन लाडेगावच्या भयभीत झालेल्या बौध्द समाजाला साथ देवुन त्यांच्या वरील अन्याय दुर करण्यासाठी आता वज्रमुठ आवळली असुन त्या साठी पुढची रणनीती ठरवण्यासाठी दि.१४ सप्टेंबर रोजी दुपारी १२:००वा.केज येथील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक गंभीर विषयावर चर्चा करण्यात आली. व वरील गावच्या प्रकरणी दि.१४ सप्टेंबर गायरान प्रकरणी बौध्द तरूण तक्रार देण्यासाठी युसूफ वडगांव पोलिस स्टेशन मध्ये गेले असता या पोलिस स्टेशनचे एपीआय दहिफळे यांनी त्यांनाच मध्ये टाकले.म्हणून याप्रकरणातील अॅट्रॉसीटी गुन्ह्यातील असलेले खरे गुन्हेगार व मोकाट फिरत असलेले आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात यावी. भयभीत झालेल्या बौध्द समाजाला कायद्याने सरंक्षण देण्याऐवजी त्यांनाच धमकवणाऱ्या एपीआय संतोष दहिफळे व बीट आंमलदार डोईफोडे यांची चौकशी करून त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करा.,

शासकीय गायरान जमिनीत बौध्द समाजाने पेरलेल्या पिकांचे केलेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी., गावातून त्यांच्या वर टाकण्यात आलेला बहिष्कार मागे घेवुन त्यांना सरंक्षण द्यावे. अशा मागण्यांचे सर्वपक्षीय निवेदन बैठकीनंतर केज तहसिलचे पुरवठा विभागाचे ना.तहसीलदार सुहास हजारे यांना देण्यात आले. या बैठकीला व निवेदन देण्यासाठी तालुक्यातील अनेक पक्ष, संघटनेचे प्रमुख कार्रकर्ते ऊपस्थित होते. या मध्ये सुरेश बचुटे( जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी बीड) , दीपक कांबळे (तालुकाध्यक्ष रिपाई केज) , बाबासाहेब मस्के, विशाल मस्के , स.का.पाटेकर (जिल्हा सचिव बसपा बीड), भास्कर मस्के (शहराध्यक्ष रिपाई केज), कैलास जावळे (आयटी सेल तालुकाध्यक्ष), बाळू भाऊ शिनगारे (स्वाभिमानी रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष) सतीश पायाळ (बीड जिल्हा उपाध्यक्ष), रमेश निशिगंध , अजय भांगे (पत्रकार व जिल्हा सचिव व्हि.बी.ए ) ,
नवनाथ पौळ (पत्रकार) , चंद्रकांत खरात सर (श्रमिक रिपब्लिकन सेना) जोगदंड साहेब साळेगाव, पद्माकर गायकवाड (लढा मानव मुक्तीचा तालुका अध्यक्ष)अशोक गायकवाड, समाधान हजारे, दिपक गायकवाड , दिलीप बनसोडे, गौतम बचुटे,(पत्रकार), बाळासाहेब ओव्हाळ ,राहुल सरवदे (रिपाई माजी तालुकाध्यक्ष)
योगेश भाई गायकवाड (स्वा.री.प.),पत्रकार महादेव काळे ,पत्रकार अनिल वैरागे , पत्रकार रंजित घाडगे यांचेसह अनेक पधादीकारी व लाडेगाव येथील विशाल धिरे व त्यांचे साथी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.