वर्धा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोल पंप रद्द करा-अनिल जवादे यांची मागणी

30

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.15 सप्टेंबर):- दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची वर्धा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील प्रस्तावित पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंप तात्काळ हटविण्याबाबत आणि त्या पंपाचे सुरू असलेले काम तात्काळ थांबविण्याबाबत यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे सविस्तर चर्चा करण्यात आली.

चर्चेअंती सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी हा पंप तात्काळ थांबविण्याचे आश्वासन श्री अनिल जवादे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिष्टमंडळाला देण्यात आले. शंकर गव्हाळे, आरती गव्हाळे बारामती यांचे अथक प्रयत्नाने मा शरदचंद्रजी पवार साहेब यांचेशी यशश्वि चर्चा घडुन आली. सोबत भंते शाकू बोधी धम्म झेन मास्टर , भन्ते राजरत्न, भन्ते मिलिंद, भन्ते नंद, महेश माकडे, गोपाल मांडवकर, दिनेश वाघ, चंद्रकांत भोयर,अजय मुळे, संदीप नांदुरकर हे उपस्थित होते