शेतकऱ्यांच्या ई -पिक पाऱ्याच्या नोंदणी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात यावी

28

🔹जिल्हाधिकारी यांचेकडे आदिवासी विद्यार्थी संघाची मागणी

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि 14 सप्टेंबर):-राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीचे पिक पेरा नोंदणी करण्यासाठी ई पिक पेरा हे ऑनलाइन अप्लिकेशन विकसित केले असले तरी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात इंटरनेट सुविधांचा अभाव आणि शेतकरी अशिक्षित असल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरची तालुका अतिदुर्गम तसेच भौगोलिक दृष्ट्या संवेदनशील भाग असून या भागातील ग्रामीण अशिक्षित शेतकऱ्यांना स्मार्ट मोबाईलचा वापर करून ई पिक पेरा नोंदणी करणे शक्य नाही.

ई पिक पेऱ्याचे अप्लिकेशन संपूर्ण महाराष्ट्रात असल्याने सर्वर फार डाऊन असते. अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ई पिक पेरा नोंदणी करण्यात यावी. अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन सादर करुन केली आहे. याप्रसंगीगिरीश जोगे ,मुकेश नरोटे आविस कोरची,उत्तम आतला गोटूल सेना गडचिरोली, परमेश्वर गावले आविस धनोरा आदि सदस्य उपस्थित होते.