सैन्य भरतीसाठी वंचित युवा आघाडी लढा उभारणार- निलेश साखरे

28

✒️बीड प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.१४सप्टेबंर):-देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवकांनी भरती पूर्व प्रशिक्षण पूर्ण करून दिवस-रात्र प्रचंड मेहनत घेतली आहे.परंतु प्रस्थापित सरकारन अद्यापपर्यंत सैन्य भरती बाबतचा निर्णय घेतलेला नाही. सैन्य भरती करण्या बाबत सरकार बोट चेपे पणाची भूमिका घेत असून,यामध्ये युवकांची मोठी कोंडी होत असल्याचा आरोप व वंचित बहुजन युवा आघाडी ने केला आहे. लवकरात लवकर सैन्य भरतीचा निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन युवा आघाडी आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे बीड जिल्हा युवक अध्यक्ष निलेश साखरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

दि.१४सप्टेंबर २०२१ रोजी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार व युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना सैन्यभरती करण्याबाबतची निवेदने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांचे मार्फत पाठवण्याचे आदेशित करण्यात आले.बीड जिल्हाधिकारी यांना सैन्य भरती लवकरात लवकर करावी याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष निलेश साखरे यांच्या आदेशान्वये बीड जिल्हाधिकारी यांना युवा आघाडीचे जिल्हा सदस्य उमेश तुळवे, सारंग जावळे,गोटू पायके,गणेश वीर यांनी निवेदन दिले.