जिवती तालुक्यातील अनेक गावे आउठ आफ नेटवर्क

27

🔹काही परिसरातील ग्राहक त्रस्त:- ऐनवेळी संपर्कच होत नाही.आनलाईन कामेही रखडली

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.15सप्टेंबर):- आधुनिक काळात मोबाईल जीवन जगण्याचा अविभाज्य घटक झाला आहे, शहारत असो किंवा गाव खेड्यात मोबाईलला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे, तंत्रज्ञनात प्रगती घडवून आणली आहे,ग्रामीण भागातील मोबाईलधारकांना मोबाईलचे नेटवर्क नसल्याने अडचण निर्माण होत आहे, नेटवर्क राहत नसल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण होत असून महत्वाची कामे रेंगाळत आहे, महत्वाचेवेळी संपर्क होत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहे, याकडे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जिवती तालुक्यातील संगणापूर, गोंदापूर,भोकसापूर,आंनदगुडा, झाली गुडा,पिट्टी गुडा, शंकर पठार,घोडणकप्पी,सोरेकासा,धाबा,राहपल्ली,नायवाडा,मरकागोंदी, घणपठार,भाई पठार,गणेरी,कलगुडी, नारायण गुडा, पळसगुडा, इंदिरा नगर,लेंडीगुडा, महाराज गुडा,गुडसेला, उमरखेड,येल्लापूर,लांबोरी, कोदेपूर,मरकलमेटा, करणकोंडी,पाटागुडा, वणी खुर्द,मालगुडा,झांझेरी,केकेझरी,पेदाआसापूर,आदी गावांमध्ये मोबाईलची रेंज नसल्याने महत्वाचेवेळी संपर्क साधता येत नाही,मोबाईल धारकांना रेंज नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो.

आता शैक्षणिक उपक्रमही मोबाईलच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याने नेटवर्क राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, इंटरनेट सेवा ढासळत असल्याचे दिसून येत आहे. महत्वपूर्ण कार्यालयाचे असो किंवा इतरही कोणते असो ऑनलाईन तक्रार नोंदवुनही प्रतिसाद मिळत नाही,त्यामुळे या समस्या कडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या परिसरातील इंटरनेट सेवा सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे,