शासनाने काढलेला आदेश रद्द करावा;पिक पाहणी तलाठी यांच्यामार्फत करण्यात यावी : गणेश भोसले

26

✒️सचिन सरतापे (प्रतिनिधी,म्हसवड)मो:-907568610

म्हसवड(दि.15सप्टेंबर):-महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाने जो जीआर काढला आहे शेतकऱ्यांनी मोबाईल वरून ई-पीक पाहणी करावी परंतु ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाहीत तसेच ॲप वरून सर्वर डाऊन होत आहे शेतकऱ्यांना पीक पाणी ऑनलाईन करत असताना प्रचंड प्रमाण अडचणीत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने काढलेला जी आर त्वरित रद्द करावा आणि अनेक पाहणी तलाठी यांच्या मार्फत पूर्वीप्रमाणे करणेत यावी
सर्व शेतकऱ्यांना या ई -पीक पाहणी मुळे मनस्ताप होत आहे.

प्रसंगी शेतकऱ्याला यामुळे आणि जर का शेतकरी अशिक्षित असेल अशा शेतकऱ्यांना पिकाची नोंद ऑनलाईन असल्यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात. तरी शासनाने गांभीर्याने विचार करून यावर तात्काळ तोडगा काढावा. तसेच काही ग्रामीण भागातील डोंगराळ भागात, वस्तीवर, वाडीवर अशा ठिकाणी मोबाईल नेटवर्क येत नाही त्यामुळे शेतकरी नोंदणी करू शकत नाही.

अशा अनेक अडचणींचा सामना सामान्य शेतकरी वर्गला करावा लागणार आहे त्यामुळे शासनाने तलाठी यांच्यामार्फत नोंदणी करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन वडूज तहसीलदार यांना आर पी आय च्या खटाव तालुक्याच्यावतीने देण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे ता.कार्याध्यक्ष गणेश भोसले, जिल्हा नेते अजित नलावडे, नेते दत्ता शिंदे, तालुका नेते अजिंक्य वाघमारे, विलास जाधव,राम घाडगे, गणेश मोरे, उपस्थित होते.