स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी भगवान टेकाळे यांची निवड

✒️अनिल साळवे( गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.15सप्टेंबर):-खुप दिवसाची घुसमट होती बरेच दिवस मनात विचार करत होतो ज्या ठिकाणी आयुष्याची २०वर्ष घातली साहेबांनी खुप काही दिल पण स्वार्थी लोक फार छळ करत होते तेथून कसे बाहेर पडावे खूप कठीण होतं कारण स्थानिक नेत्यांनी घात केला संघटने पासुन पक्ष बांधनी पर्यंत(2021) स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन जातीसाठी व समाजासाठी अहोरात्र कष्ट केले.

संघटनेसाठी व पक्षासाठी फुल ना फुलाची पाकळी लावली व संघटनेला पक्षाला ज्या त्या पद्धतीने बळ दिल,एकनिष्ठ तिने काम केलं पण केलेल्या कामाच फळ समाजा पर्यंत देऊ शकलो नाही. स्थानिक च्या नेत्यांमुळे प्रश्न सोडवू शकलो नाही फक्त स्वार्थी आणि लबाड नेत्यांमुळे.
असो, आता माञ काम माझ्या शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या हितासाठी करत राहील आणि विश्वासघाती मित्रांसाठी मि उत्तर देण्यासाठी नवीन मार्ग निवडला ते म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून त्यांना उत्तर देऊ.

मा.किशोर भाऊ ढगे (जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना परभणी) यांनी दिलेल्या पदाचा म्हणजेच गंगाखेड तालुका अध्यक्ष पदाचा मी स्वीकार करतो व हा पदभार स्वीकारतो इथून पुढे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी मी सतत प्रयत्न करत राहणार.यासाठी आपल्या सारख्या असंख्य मित्रांचे मला गरज आहे समाजकारणातून राजकारण अरे राजकारणातून हक्क हे सर्वसामान्यांना मिळवून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत राहील आज मला माननीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मा.किशोर भाऊ ढगे (स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष) तसेच भगवानराव शिंदे मसलेकर (स्वाभिमानी शेतकरी पक्ष जिल्हाध्यक्ष) व जयवंत दादा कुंडगीर (विधानसभा अध्यक्ष गंगाखेड) यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड तालुका अध्यक्ष पद दिलं त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे.

माझ्या सोबत माधवराव खोकले तालुकाध्यक्ष गंगाखेड स्वा.शे.पक्ष तसेच सिद्दुअप्पा दावलबाजे अँटो युनियन तालुकाध्यक्ष गंगाखेड व मुलगीर मामा यांची पालम तालुकाध्यक्ष स्वा.शे.सं पदी निवड करण्यात आली. आमचा सत्कार करताना जाफरभाई स्वा.शे.स.जिल्हा उपाध्यक्ष परभणी तसेच गमे मामा जिल्हा अध्यक्ष दुध संघ परभणी व पंडीत गंगाधरराव भोसले पुर्णा तालुकाध्यक्ष स्वा.शे.सं यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED