भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा व भाजपा युवा मोर्चा यांच्यावतीने आंदोलन

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.15सप्टेंबर):-आज गंगाखेड तहसील कार्यालय येथे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सहा जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या निवडणुका पुढे घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा व भाजपा युवा मोर्चा यांच्यावतीने आंदोलन करून लेखी निवेदन देण्यात आले.

सदरील निवेदन मध्ये मा.भगतसिंग कोशारी जी (महामहिम राज्यपाल महाराष्ट्र) यांना निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना मा.रामप्रभू जी मुंडे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र तथा माजी नगराध्यक्ष गंगाखेड, प्रशांत जी फड भाजपा जिल्हा सरचिटणीस परभणी, हिरा मेहता जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, सुनिल ठाकूर मा.नगरसेवक न.प.गंगाखेड, गोविंद जी रोडे, जगन्नाथ आंधळे, अर्जुन पुरनाळे, राजेश तमखाने, मोहन गीते, बलभीम दहिफळे, अजय चव्हाण, सय्यद मुदस्सीर, अक्षय आंधळे, प्रशांत मुंडे, गोटू मुंडे मा.सरपंच, महादेव चाटे, भाऊ भेंडेकर, रामदास भेंडेकर, माधव क्षीरसागर, सुरेश मलगे, रमेश मुंढे व इतर भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!