कार्यानुभव उपक्रमांतर्गत विद्यार्थी कलागुणांना वाव देणारी ओरिगामी कार्यशाळा – सुधाकर यादव

46

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.१५सप्टेंबर):-कोरोना काळात शाळा बंद व शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत वेगळे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासा बरोबरच इतर विषयांची गोडी लागावी,त्यांच्यातील कलागुण बाहेर काढून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या उद्देशातून आष्टी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत व सुधाकर यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रम राबवण्यात येतात.या अशा उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा पंचायत समिती अंतर्गत प्रवारासंगम या शाळेत कार्यरत असलेल्या आदर्श उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शीतल झरेकर मॅडम यांनी ओरिगामी म्हणजे कार्यानुभव कागद काम कार्यशाळा ऑनलाइन झूम ॲपच्या माध्यमातून घेण्यात आली.

या कार्यशाळेत श्रीमती शीतल झरेकर मॅडम यांनी मुलांना वेगवेगळे कागदी फुले व फुलांपासून वेगवेगळ्या प्रकारे हार कसे बनवायचे याविषयी मार्गदर्शन केले व मुलांनी पण याच पद्धतीने कागदाच्या वस्तू बनवून दाखवल्या.श्रीमती शीतल झरेकर मॅडम यांनी मुलांना कागद काम करताना कोणते साहित्य आवश्यक असावे व ते कसे वापरायचे याचे सखोल मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या.या कार्यशाळेत जि.प.प्रा.शा.पाटसारा,जि.प.प्रा.शा.वनवेवाडी,प्रा.शा.नाकडेवस्ती,प्रा.शा.नरवडेवस्ती,प्रा.शा.हिवरा,प्रा.शा. मांडवा येथील जवळजवळ दिडशे मुलांनी भरभरून प्रतिसाद नोंदवून वेगवेगळे साहित्य बनवले.

सदर कार्यशाळेचे नियोजन व सूत्रसंचालन सुंदर अक्षरतज्ञ अनिल बेंद्रे यांनी केले.सर्वांचे स्वागत संजय लाड यांनी तर आभार पोकळे सर यांनी मानले.या कार्यशाळेत आष्टी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन असा वेगळा उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.या कार्यशाळेस केंद्रप्रमुख जावेद पठाण,मुख्याध्यापक विष्णूने नेरकर,मुख्याध्यापक जगन्नाथ सोनवणे,मच्छिंद्र फुंदे, सर,बोडके सर,श्रीमती पवार,धोंडे सर यांनी उपस्थिती दर्शवून उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकाचे व सर्व आदर्श गुरुजनांचे व समाविष्ट विद्यार्थ्यांचे कौतुक केले.